Type to search

Breaking News maharashtra

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी

Share

मुंबई दि. ६ : एमपी मिल कंपाउंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर लोकायुक्तांनी ताशेरे ओढल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी तर आता यावरून थेट मुख्यमंत्र्यावर  यांच्यावर निशाणा साधत प्रकाश मेहतांना क्लिन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पडल्याची जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी एम. पी. मिल कंपाऊंड प्रकरणी प्रकाश महेता यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली.

ताडदेव मिल कंपाउंड घोटाळ्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत विरोधी पक्षाने सभागृहात केलेल्या आरोपांवर लोकयुक्तांनी शिक्कामोर्तब केले. एव्हढच नाही तर मंत्री म्हणून त्यांनी आपली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडली नाही, असे गंभीर आक्षेप नोंदवल्याचे धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणत सतत क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ देखील उघडे पडल्याची टीका केली. तसेच आता तरी किमान जनाची नाही तर मनाची लाज ठेऊन मेहतांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्विकारावा, असे धनंजय मुंडे म्हणाले.

ताडदेव मिल कंपाऊंड घोटाळ्यात गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेतांचा हात असून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडें यांनी केली आहे. दरम्यान गृहनिर्माणमंत्री मेहता यांनी मात्र अहवालात ठपका ठेवलाय, अस कुणी सांगितले, ठपका ठेवलाय असा अहवाल कुठे आहे,असा सवाल करत असा काही अहवाल आलाय लोकायुक्तांचा अहवाल आलाय या संबंधी माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. शासनाकडे आला असावा आणि शासनाने मला कळवल असही काही नाही.’ असे म्हटले आहे.

मुंबईतील ताडदेव येथील एम.पी. मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता दोषी असल्याचा ठपका न्यायमुर्ती एम. एल. ताहलीयानी आपल्या चौकशी अहवालात ठेवला आहे. तसेच एम. पी. मिल कंपाऊंड एसआरए प्रकल्पाला मंजुरी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांनी या प्रकरणाच्या फाईलवर मारला होता. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना अवगतच केले नसल्याचे आता चौकशीत समोर आले आहे. तसेच त्यांनी आपली जबाबदारी देखील निष्पक्ष पार पाडल्याचा ठपका लोकायुक्तांनी चौकशी अहवालात ठेवला आहे.

फडणवीस मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांची अशीच निःपक्षपाती चौकशी होणार का? आणि दोषी आढळल्यानंतर आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी असल्याचा अहवाल लोकायुक्तांनी दिला आहे.

त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हा सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहतांना क्लीन चिट दिली होती. मात्र चौकशीमुळे सत्य समोर आले आहे. एसआरए घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वारंवार विधानसभेत लावून धरली असल्याचेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. आज चौकशीनंतर घोटाळा उघडकीस आला, असेही आमदार जयंत पाटील म्हणाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!