गुहा येथे महिलेचा मृतदेह सापडला

0

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील गुहा येथील बोरूडेनगर येथील निर्जन शेतामध्ये संशयास्पद महिलेचा मृतदेह आढळून आला. मयत महिलेचे नाव नंदा वाघमारे (वय 40 वर्षे) असे आहे.

गुहा परिसरात दोन दिवसापुर्वी एका अज्ञात मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर आज बोरूडेनगर येथील निर्जन शेतामध्ये नंदा वाघमारे या महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या मृत्यू कारण शवविच्छेदना नंतर स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती कळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थाळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

गुहा परिसरात मृतदेह सापडण्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली असून भिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

*