Type to search

जळगाव

गुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला

Share

जळगाव | यावल तालुक्यातील आसरा बारी जंगल शिवारात गुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अचानक अस्वलाने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. जगदिश दमड्या बारेला (वय ३०) रा. आसराबारी असे जखमी युवकाचे नाव आहे.

जगदिश हा नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी गुरे घेवून वर्डी आसराबारी जंगल शिवारात गुरे चारण्यासाठी गेला होता. अचानक अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्लयात जगदिश याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. जगदिश याला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!