Type to search

धुळे

गुरुंना वंदन; गुरु पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

Share

धुळे | गुरुपौर्णिमेमुळे शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरामध्ये दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली होती. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होतेे. तर खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.

गुरुपौर्णिमेनिमित्त शहरासह परिसरातील मंदिरे सजविण्यात आली होती. मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये आज पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली होती. लाखो भाविकांनी गुरुंना वंदन केले व आशिर्वाद घेतला. शहरातील स्वामी समर्थ केंद्रात देखील गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

शहरातील सर्व स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. केंद्रांमध्ये दर्शनासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. सकाळी १०.३० आरती झाली.

साईदर्शन कॉलनी- येथील चितोड रोड वरील साई दर्शन कॉलनी परिसरातील गजानन महाराज मंदीरात गुरुपौर्णिमेनिमित्त कपिकुलासिद्धपीठम् पिठाधिकारी १००८ गजानन महाराजांचे निस्सीम भक्त श्री महंत तपोमूर्ती परमहंस सदगुरु वेणाभारती महाराज आणि उत्तराधिकारी कृष्णमयी (नाशिक) यांचे गुरुमहिमा आणि शिष्य यांच्या संबंधावर प्रवचन झाले.

नऊ कुंडीय गायत्री महायज्ञ- अखिल विश्व गायत्री परिवार, शांतीकुंज-हरिव्दार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१६ जुलै रोजी गुरु पौर्णिमा निमित्ताने गायत्री प्रज्ञापीठात सकाळी ९ ते १२.३० वाजेदरम्यान गायत्री प्रज्ञापीठ, नकाणे रोड, देवपूर येथे नऊ कुंडीय गायत्री महायज्ञ झाला. व वृक्षारोपण करण्यात येवून वृक्ष वाटप करण्यात आले.

मानव रुहानी केंद्र- शहरानजीक असलेल्या बिलाडी रोडवरील विश्‍व मानव रुहानी केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता भजन व गायनाचा कार्यक्रम झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!