गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप-Photo Gallery

0
जळगाव । दि.13 । प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर झाला.
यात जळगाव शहराचा निकाल 90.51 टक्के लागला. तर शहरातील तब्बल 8 शाळांनी 100 चा आकडा गाठला.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज जाहीर करण्यात आला.
निकाल जाहीर होण्याच्या उत्सुकतेने विद्यार्थ्यांनी दुपारी 12 वाजेपासूनच सायबर कॅफेंवर गर्दी केली होती. काही विद्यार्थ्यांनी मोबाईलवरच निकाल पाहणे पसंत केले.
शहरातील एकुण 7 हजार 357 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 6 हजार 659 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जळगाव शहराचा निकाल 90.51 टक्के लागला.

शहरात मुलींचीच बाजी
बारावी पाठोपाठ दहावीच्या निकालातही मुलींनींच बाजी मारली आहे. यात ए.टी.झांबरे महाविद्यालयातील स्नेहा झांबरे व जागृती पाटील या विद्यार्थीनी 99 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादीत केल आहे. तसेच नंदिनीबाई विद्यालयात वैभवी कचरे या विद्यार्थीनीने 97.40 टक्के मिळवून शाळेतील प्रथम क्रमांक मिळविला आहे. सेंट लाँरेन्स शाळेतील देविका संजय चौधरी या विद्यार्थीने विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून बोर्डात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

8 शाळांचा 100 टक्के निकाल
शहरातील 8 शाळांनी 100 चा आकडा पार करत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. शहरातील न्यु. इंग्लिश मिडीयम स्कुल, रोझलॅण्ड इंग्लिश मिडीयम स्कुल, प्रोग्रोसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कुल, अँग्लो उर्दू हायस्कुल पिंप्राळा, सेंट टेरेसा हायस्कुल, उज्वल इंग्लिश मिडीयम स्कुल, आदर्श सिंधी हायस्कुल, बी.यु.एन रायसोनी मराठी स्कुल, श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यामंदिर या 8 शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे.
शानभाग विद्यालयातील

उज्वल यशाची परंपरा
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब.गो.शानभाग माध्यमिक विद्यालयाने 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. प्रसन्न पगार या विद्यार्थ्यांने 97.40 टक्के गुण मिळवून प्रथम, मयुर पवार या विद्यार्थ्यांने 97.20 टक्के गुण मिळवून द्वितीय तर राधेय चौधरी व सुप्रभा पाटील या दोन्ही विद्यार्थ्यांनी 96.60 मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

प.न.लुंकड कन्या शाळा
प.न.लुंकड कन्या शाळेतील युक्ता कापडे व अश्विनी मोरे या विद्यार्थींनींने 96.20 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. आदिती चौधरी या विद्यार्थीनीने 96 टक्के गुण मिळवून द्वितीय तर प्रिती पाटील या विद्यार्थीनीने 95.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. शाळेतील 15 विद्यार्थीनींनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहे.

नंदिनीबाई वानमराव
विद्यालयातील वैभवी कचरे प्रथम
नंदिनीबाई वानमराव विद्यालयाचा 95.94 टक्के निकाल लागला असून 13 विद्यार्थीनींनी 90 पेक्षा अधिक गुण मिळविले आहे. यात वैभवी कचरे 97.40 प्रथम क्रमांक, धनश्री चौधरी 97 टक्के द्वितीय, किर्ती सोनवणे 96.20 तृतीय क्रमांक मिळविला आहे.

ला.ना.शाळेचा 97.42 टक्के निकाल
ला.ना. सार्वजनिक विद्यालयाचा 97.42 टक्के निकाल लागला असून 134 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक टक्के मिळविले आहे. यात संकेत चौधरी 96.80 प्रथम क्रमांक, अथर्व सावदेकर 96.40 द्वितीय क्रमांक, महेश कन्हेरे 95.40 तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या माता-पित्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.

का.उ.कोल्हे विद्यालयाचे घवघवीत यश
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाचा 81.34 टक्के निकाल लागला असून रोहित बारी या विद्यार्थ्याने 93.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर लोकेश खडके याने 92.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तर ओनल चौधरी या विद्यार्थीनीने 91.60 टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

इकरा उर्दू हायस्कुलचा 95.37 टक्के निकाल
इकरा उर्दू हायस्कुल सालारनगरचा 95.37 टक्के निकाल लागला असून कामरान शेख हारुन 92.80 टक्के गुण मिळवून प्रथम, अबुजर मोहंमद रफिक शेख 92.20 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, शेख रुही नाज अखलाक अहमद 91.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

इकरा शाहीन उर्दू हायस्कुल
इकरा शाहीन उर्दू हायस्कुलचा 93.95 टक्के निकाल लागला असून मलिक हरशिया नियाजोद्दीन 90.80 टक्के प्रथम, शेख तस्कीन इस्माईल 88.60 टक्के द्वितीय, रंगरेज उज्मा उमर 87.80 टक्के तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

इकरा पब्लिक स्कुल
इकरा रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमधून शेख मुन्तकीन शेख शफीक 81 टक्के प्रथम, जैद मोहम्मद पिंजारी 76.40 टक्के द्वितीय, काझी मो.आकबी अ. अजीज 70.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे.

मौलाना अब्दुल रज्जाक हायस्कुल
मौलाना अब्दुल रज्जाक अँग्लो उर्दू हायस्कुला 84.27 टक्के निकाल लागला असून शेख इरबाज या विद्यार्थ्याने 84.20 टक्के गुण मिळवून प्रथम, अनम अब्दुल रहेमान या विद्यार्थीनीने 83.80 टक्के गुण मिळवून द्वितीय तर मिर्झा तबरेज बेग या विद्यार्थ्याने 82.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले.

महाराणा प्रताप विद्यालयाचा
87.50 टक्के निकाल
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 87.50 टक्के निकाल लागला असून करण बारघरे या विद्यार्थ्याने 88.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. विद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे. संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

रायसोनी इंग्लिश मिडीयम स्कुलचे पाच विद्यार्थी नव्वदीपार
रायसोनी इंग्लिश मिडीयम स्कुलने 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून पाच विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहे. यात राजेश्री येवले, हितेश कोठावदे या दोन्ही विद्यार्थ्यांनी 96 टक्के गुण मिळवून प्रथम तर मुस्कान मुथा या विद्यार्थ्याने 93 टक्के गुण मिळवून द्वितीय तर सेजल जैन व पुजा सपकाळे या विद्यार्थीनींनी 91.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

मिल्लत हायस्कुलचा 92.59 टक्के निकाल
मिल्लत हायस्कुल मेहरुन या शाळेचा 92.59 टक्के निकाल लागला असून शेख तहेसीन जहॉ मोहम्मद नासिर व शेख निदा कौसर शहाब या दोन्ही विद्यार्थीनींनी 88 टक्के गुण मिळवून प्रथम, शेख शिबान फाईज अहेमद हुसेन व खान सना कोसर अमजद या दोन विद्यार्थ्यांना 86.20 टक्के गुण मिळवून द्वितीय तर सैय्यद शहजाद जहांगीर अली 86 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

भगीरथ इंग्लिश मिडीयम स्कुलमधून राहुल वाघ प्रथम
भगीरथ इंग्लिश मिडीयम स्कुलचा 98.55 टक्के निकाल लागला असून राहुल वाघ, सोपान मोरे या दोन्ही विद्यार्थ्यांनी 95.08 टक्के गुण मिळवून प्रथम, भावेश गुरव याने 95.06 टक्के गुण मिळवून द्वितीय तर कल्पेश वाघ या विद्यार्थ्याने 95.02 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. 9 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविला आहे.

युनिक उर्दू हायस्कुल
तांबापुर येथील युनिक उर्दू हायस्कुलचा 85 टक्के निकाल लागला असून अल्तमश खाटीक या विद्यार्थ्याने 81.80 टक्के गुण मिळवून प्रथम, नजमुरसहर सैय्यद साबीर अली या विद्यार्थ्याने 78.20 टक्के गुण मिळवून द्वितीय तर शमसोद्दीन शेख शरफोद्दीन या विद्यार्थ्याने 77.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

रायसोनी मराठी माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल
रायसोनी मराठी माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून 12 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादीत केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे कौतुक करण्यात आले.

न्यु इंग्लिश मिडीयम स्कुलमधून तेजस सोनवणे व हेरल जोशी प्रथम
न्यु इंग्लिश मिडीयम स्कुलचा 100 टक्के निकाल लागला असून तेजस सोनवणे व हेरल जोशी या दोन्ही विद्यार्थ्यांनी 90 टक्के गुण मिळवून प्रथम तर राहुल भावसार या विद्यार्थ्याने 89 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांका पटकाविला आहे.

अभिनव माध्यमिक विद्यालयाचा 83 टक्के निकाल
अभिनव माध्यमिक विद्यालयातून धिरजकुमार उन्हाळे 90.80 टक्के गुण मिळवून प्रथम, विजया गिरमकर 89.60 टक्के गुण मिळवून द्वितीय तर दिपेश कदम 88.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून शाळेचा 83 टक्के निकाल लागला आहे.

प्रगती माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश
प्रगती माध्यमिक विद्यालयाचा 99.02 टक्के निकाल लागला असून ऋषिकेश पाठक या विद्यार्थ्याने 91.40 टक्के गुण मिळवून प्रथम, सायली दलाल या विद्यार्थीनीने 88.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तर तेजस चव्हाण या विद्यार्थ्याने 87.40 टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

खुबचंद सागरमल विद्यालयाचा 86.77 टक्के निकाल
खुबचंद सागरमल विद्यालयाचा निकाल 86.77 टक्के लागला असून दिपाली चांगरे 86.20 टक्के गुण मिळवून प्रथम, पिय्रंका माळी 82.80 टक्के गुण मिळवून द्वितीय तर दिपाली लोहार 80.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले.

सिद्धी विनायक विद्यालयातून प्रांजल कोळी प्रथम
सिद्धी विनायक विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून 93.37 टक्के शाळेचा निकाल लागला आहे. शाळेतून प्रांजल कोळी हिने 91.80 टक्के गुण मिळवून प्रथम तर काजल महाजन या विद्यार्थीने 90.60 टक्के गुण मिळवून द्वितीय तर माधुरी मुंदडा या विद्यार्थीनीने 90 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेतील 42 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे.

आर.आर.विद्यालयातील 57 विद्यार्थी नव्वदीपार
रावसाहेब रुपचंद विद्यालयाचा 99.60 टक्के निकाल लागला असून 57 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहे. ऋषिकेश सराफ याने विद्यार्थ्याने 98.40 टक्के गुण मिळवून प्रथम माहेश्वरी राम नारायण या विद्यार्थ्याने व फालगुणी जोशी या विद्यार्थीनीने 97.60 टक्के गुण मिळवून द्वितीय तर अमय पाटील व आयुष कलंत्री या दोन्ही विद्यार्थ्यांनी 97.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मानव सेवा विद्यालयाचा 98.11 टक्के निकाल
मानवसेवा विद्यालयाचा 98.11 टक्के निकाल लागला असून शाळेतून हर्षद कोळी 88 टक्के प्रथम, प्रियंका चौधरी 83 टक्के द्वितीय, भार्गव खेडकर 82 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात येवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


शहरातील विद्यालयांचा निकाल

आर.आर.विद्यालय
96.07

न्यु इंग्लिश मिडीयम स्कुल
100

भाऊसाहेब राऊत विद्यालय
64.81

पी.के.गुळवे मुलींचे विद्यालय
87.11

ला.ना.विद्यालय
97.42

जिल्हा परिषद विद्या निकेतन
72.17

नंदिनीबाई विद्यालय
95.94

नुतन मराठा विद्यालय
73.05

अँग्लो उर्दू हायस्कुल
80.44

इकरा उर्दू हायस्कुल प्रतापनगर
95.37

रोझलॅण्ड इंग्लिश मिडीयम स्कुल
100

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कुल
100

प्रगती माध्यमिक शाळा
99.02

प.न.लुंकड विद्यालय
96.45

महाराणा प्रताप विद्यालय
86.50

ग्राम विकास विद्यालय
55.55

पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालय
69.40

अँग्लो उर्दू हायस्कुल पिंप्राळा
100

माध्यमिक विद्यालय पिंप्राळा
75.51

जिजामाता माध्यमिक विद्यालय
93.05

बहिणाबाई माध्यमिक विद्यालय
93.65

शंकुतला जे. माध्यमिक विद्यालय
86.66

केसीई सोसायटीचे माध्यमिक विद्यालय
98.75

स्व.बी.के.भाईटे माध्यमिक शाळा
75.00

भगिरथ इंग्लिश मिडीयम स्कुल
98.55

सेंट टेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुल
100

उज्वल इंग्लिश मिडीयम स्कुल
100

यादव देवचंद पाटील विद्यालय
92.13

श्रीराम माध्यमिक विद्यालय
89.28

जय दुर्गा माध्यमिक विद्यालय
95.18

इकरा शाहीन उर्दू हायस्कुल
93.55

मिल्लत हायस्कुल मेहरुण
92.59

माध्यमिक विद्यालय मेहरुण
50.00

सिद्धी विनायक विद्यालय
93.37

काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय
81.34

रामलालजी चौबे हायस्कुल
86.20

LEAVE A REPLY

*