गुढी उभारुन हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत

0

जळगाव |  प्रतिनिधी :  चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला हिंदु धर्माच्या नववर्षाला गुढीपाडव्याने सुरु होत असते. सुख, समृध्दी अन् विकासाच्या मांगल्याची गुढी उभारून जळगावकरांनी आज हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी शहरातील धार्मिक संस्था, सामाजिक संस्थातर्फे शोभायात्रा काढण्यात आली.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी महत्वपूर्ण मानला जाणारा सण आज सर्वत्र साजरा करण्यात आला. नववर्ष असल्याने घरोघरी गुढी उभारुन त्या गुढीला सजविले जाते. या गुढीला देवाचे रुप मानुन साखरेचा हार घातला जातो. गुढीपाडव्याचा शुभमुहुर्तावर सोन्या-चांदीची दागिने, वाहने, इलेक्टॉनिक वस्तु, प्लॉट, घर खरेदीचा अनेकांनी मुहुर्त साधला. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर कोटयावधी रुपयांची उलाढाल झाली.

शहरात नववर्ष शोभायात्रा

जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान आयोजित व शहरातील विविध पंथ, संप्रदाय, सामाजिक संस्था, भजनी मंडळे, गणेश मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्षानिमित्त भव्यशोभा यात्रा काढण्यात आली. शोभायात्रेला विसनजी नगर येथील श्री पंचमुखी गायत्री मंदिर येथून सुरवात झाली.

यावेळी पिपल्स बँकचे भालचंद्र पाटील, श्रीराम मंदिराचे विश्‍वस्त शिवाजीराव भोईटे, गणानाम सत्संग मंडळाचे छोटू नेवे, श्री संप्रदायाचे मनोज सोनवणे, स्वराज निर्माण सेनेचे बंटी सपकाळे, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडीया, आप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठानचे राजेंद्र भालेराव, गायत्री परिवाराचे भगवती प्रसाद मुंदडा, आदी मान्यवरांच्या उपस्थित महाआरती करून शोभायात्रेला प्रारंभ झाला.

शोभायात्रेच्या प्रारंभी मंगलवाद्य, सनई, दोने घोडेस्वार, लेझीम पथक, संप्रदाय गणेश मंडळांचे कार्यकर्ते, साधक, उपासक भजन नामस्मरण करीत होते. शोभायात्रेतील चित्ररथामध्ये सुरवातील वंदनीय भारतमाता, प्रभु श्रीराम, हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांच्यासह विविध पंथ व संप्रदायांच्या संताच्या प्रतिमा होत्या. या शोभायात्रेत भजनी मंडळांनी आवर्जुन सहभाग घेतला.

रथचौकात गावगुढीचे पुजन

शोभायात्रेच्या समारोपानंतर रथ चौकात उभारलेल्या भव्य अशा गावगुढीचे आ. राजुमामा भोळे, शनिपेठ पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान, दीपक जोशी, सचिन नारळे, प्रभाकर पाटील, संजय कोरके, छोटू नेवे, अशोक माळी, प्रकाश शिंद, भैय्या घाडगे, मनोज बारी, योगेश कासार आदींच्या उपस्थितीत गावगुढीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा मंदिरात आली.

चिमुकल्यांनी साकारल्या संतांच्या वेशभुषा

शोभायात्रेत संत ज्ञानेश्‍वरांच्या वेशभुषेत देवांशु सुर्यवंशी, झाशीच्या राणीच्या भुमिकेत हिरल सुर्यवंशी, कोमल कुळकर्णी, शिवाजी महाराजांच्या भुमिकेत दर्शन बारी तर बहिणाबाई चौधरी यांची वेशभुषा ऊपर्वा बारी यांनी साकारली होती.

संप्रदायिक जिल्हा भक्त सेवा मंडळ

हिंदू धर्माचे जगतगुरु अनंत श्री विभुषित जगतगुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दाक्षिण पीठ रत्नागिरी पिठाचे उत्तराधिकारी प.पू.कनिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने जळगाव नगरीत हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी महापौर, नितीन लढ्ढा, आ. राजुमामा भोळे, नाभिक महामंडळाचे किशोर सुर्यवंशी, अनिल तापडीया, संतोश नारखेडे, मनोज सोनवणे आदीसह स्वामी नरेंद्राचार्य महाराज व प.पू कनिफनाथ महाराज यांचे भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते.

या शोभायात्रेतनू विविधतेत एकतेच्या संदेशासोबतच समाजात आवश्यक असणार्‍या मुल्यांचा संदेश देण्यात आला. बेटी बचाव बेटी पढाओ, स्त्री-पुरुष समानता बाबत सादरीकरण सर्जनशील उप्रकमातून करण्यात आले. या शोभायात्रेत नंदुरबार येथील आदिवासी नृत्य हे सामायिक मिलनाचे उत्तम साधन ठरले. शोभायात्रेच्या सुरवातीला लहान बालिकांच्या पारंपारिक पोशाखातील लेझीम पथक आणि आदिवासी लोकनृत्यांने उपस्थितांची लक्ष वेधले.

उगवत्या सुर्याला वाहिले अर्घ्य

संस्कार भारतीतर्फे महानगरपालिकेच्या प्रांगणात सुवासिनींच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उगवत्या सुर्याला अर्घ्य वाहून गुढीच्या साक्षीने हिंदु नववर्षाचे स्वागत केले.

संस्कार भारतीचा गुढपाडवा पहाट मैफल

संस्कार भारतीतर्फे आयोजित महानगरपालिकेच्या प्रांगणात सुरेल मैफिलीच्या पाडवा पहाटने हिंदु नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुष्यंत जोशी, भागवत पाटील, सिका जोशी, श्रृती वैद्य, पुरुषोत्तम पाटील, हर्षदा कासार, अपेक्षा पाटील, दिव्या चौधरी, विशाखा जोशी, निळकंठ कासार, जगदीश गंगावणे, माधव पारगावकर, पल्लवी देशपांडे, केतकी व श्रावणी भालेराव, आसावरी जोशी, माधुरी जाधव, अनिता निवाणे, गौरी निमजे यांनी ‘विजयी पतका श्री रामाची, अबीर गुलाल उधळीत रंग, पैल तो गे काऊ’ यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. निवेदन वैशाली पाटील यांनी केले.

सिंथेसाइझरवर गिरीश मोघे, संवादिनीवर दिलीप चौधरी, ऑक्टोपॅड व ढोलकीवर शरद भालेराव तर तबल्यावर दर्शना व सारंग जेऊरकर यांनी साथसंगत केली. यशस्वीतेसाठी भुषण खैरनार, किशोर सुर्वे, चित्रा लाठी, रेखा लढे, संगीता पिंगळे, शारदा सावदेकर, गीता रावतोळे, शालिनी झांबरे यांनी परिश्रम घेतले. ी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात सघोष पथसंचलन

गुढीपाडवा व आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बीएसएनएल ऑफीसमागील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहापासून पथसंचलनास प्रारंभ झाला. स्वातंत्र्य चौक, नवीन बसस्थानक, भजे गल्ली, जिल्हापेठ मार्गे पुन्हा प्रारंभस्थळी आल्यावर संचलनाचा समारोप झाला.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सहकार्यवाह बाळासाहेब किसनराव चौधरी, डॉ. राजेश पाटील, शहर संघचालक डॉ. विलास भोळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी बाळासाहेब चौधरी म्हणाले की, देशाला परम वैभवाला नेण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. भारतीय समाजातील अस्मितांचे जागरण करण्याचे, समाजप्रबोधनाचे काम संघ करीत आला आहे.

आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते. असे सांगितले. डॉ.राजेश पाटील यांनी आपल्या मनोगतात किल्लारी भूकंपानंतर संघ स्वयंसेवकांनी केलेल्या मदत व पुनर्वसन कार्याचा आवर्जून उल्लेख केला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मधुभाई कुळकर्णी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*