गुढीपाडवादिनी भुसावळला मरिमातेच्या बारागाड्या

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  शहरातील जुना सातारे भागात असणार्‍या मरिमाता मंदिरात गुढीपाडवा या मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर गेल्या अनेक वर्षापासूनच्या परंपरेनुसार उत्साहात बारागाड्या ओढण्यात आल्या.

मराठी नववर्षदिन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता जळगाव नाक्यासमोरील मरिमातेच्या मंदिरातील मुर्तीचा अभिषेक व महापुजा आणि त्यानंतर महाआरती करण्यात आली. गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवार दि. २८ रोजी दिवसभर मरिमातेच्या यात्रेनिमित्त छोटीमोठी दुकाने जळगाव रोडवर लागली होती.

दुपारनंतर बारागाड्या ओढण्याची तयार सुरू झाली. गुरूद्वाराजवळील मरिमाता मंदिरात देखील पुजन करण्यात आले. त्यानंतर मार्गात असलेल्या श्री हनुमान मंदिर, मुंजोबा मंदिर, बहिरम बुवा मंदिर, म्हसोबा मंदिर आदी ठिकाणच्या देवतांना मानसन्मान देवून त्यांना आवाहन करण्यात आले.

त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गुरूद्वाराजवळील मरिमाता मंदिर येथून ते जळगाव नाक्यासमोरील मरिमाता मंदिरापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या. भगत म्हणून प्रमोद वाघुळदे तर त्यांना बगले देवेंद्र सपकाळे व श्री.लोखंडेहे होते. बारागाड्या पाहण्यासाठी भुसावळसह परिसरातील अनेक नागरिकांनी जळगाव रोडच्या दुतर्ङ्गा गर्दी केली होती. सुमारे दिड किलोमीटर अंतरापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या.

LEAVE A REPLY

*