गुजरात राज्यसभा निवडणूक : अहमद पटेल विजयी

0

गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचा अवघ्या अर्ध्या मतानं विजय झाला.

काँग्रेसचा हा विजय भाजपसाठी मोठा धक्का आहे.

अनेक घडामोडीनंतर मध्यरात्री 2.00 वाजता हा निकाल जाहीर झाला.

अहमद पटेल यांना 43.50 मतं मिळाली आहेत.

अहमद पटेल यांच्या या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला..

इतर दोन जागांवर अपेक्षेनुसार भाजप अध्यक्ष अमित शहा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विजयी झाल्या.

शहा, इराणी यांना प्रत्येकी ४६, पटेल यांना ४४ मते पडली. ३८ मते घेतलेले बलवंतसिंह मात्र पराभूत झाले.

LEAVE A REPLY

*