गुजरात, पश्चिम बंगाल : राज्यसभेच्या 9 जागांसाठी मतदान सुरू

0
गुजरात राज्यसभेच्या 3 जागांसाठी तर पश्चिम बंगालच्या 6 जागांसाठी आज (मंगळवार) मतदान सुरू आहे.
सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होईल. तर 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि संध्याकाळी सात वाजता निकाल जाहीर करण्यात येईल.
सर्व 9 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 18 ऑगस्टला संपणार आहे.
गुजरातमध्ये भाजपकडून या जागांवर अमित शहा, स्मृती ईराणी आणि बलवंत सिंह राजपूत आहेत. तर सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
विशेष म्हणजे, काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाने आपल्या 44 आमदारांना बेंगळुरूला पाठवले होते. ते सगळेच निवडणुकीसाठी परतले आहेत.
तरीही, आपलाच विजय होईल असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

*