गुजरातमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, स्मृती इराणी राज्यसभेवर

0

दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत अमित शहा यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

येत्या 8 ऑगस्टला गुजरातमधील राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे.

सध्या शहा हे गुजरातचे आमदार आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे.

त्यामुळे अमित शहा ही निवडणूक लढवणार किंवा नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, आता ते राज्यसभेवर जाणार हे निश्चित झाल्याने त्यांच्या गुजरातच्या राजकारणात परतण्याच्या शक्यता पूर्णपणे मावळल्या आहेत. गुजरातमधील एकूण 11 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. यामध्ये स्मृती इराणी आणि दिलीप भाई पंड्या यांचाही समावेश आहे.

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल संसदीय मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

LEAVE A REPLY

*