गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नशेत तर्रर्र पुत्राला विमानातून हाकलले

0

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांचा सुपुत्र जयमीन पटेल हे नशेत तर्रर्र असल्यामुळे त्यांना विमानात प्रवेश दिला नसल्याचे फ्लाइट ऑफिसरने सांगितले. यावेळी जयमीन पटेल यांनी फ्लाइटच्या स्टाफसोबत हुज्जतही घातली.

दुसरीकडे, नितिन पटेल यांनी हे वृत्त फेटाळले आहे. लोक अफवा पसरवत आहे. जयमीन, पत्नी आणि मुलीसोबत ग्रीसला जाण्यासाठी निघाले होते.

न्यूज एजन्सीनुसार, जयमीन पटेल, पत्नी आणि मुलगी सोमवारी सकाळी ग्रीस जाण्यासाठी एअरपोर्ट पोहोचले. तिघांचे तिकीटे आधीच बुक झाले होते. परंतु, जयमीन पटेल हे चालण्याच्याही अवस्थेत नव्हते. त्यांनी परिस्थिती पाहून स्टाफने आक्षेप घेतला.

जयमीन नशेत इतके तर्रर्र होते की, त्यांना इमिग्रेशन काउंटर आणि इतर चौकशीसाठी अक्षरश: व्हीलचेअरवर घेऊन जावे लागले. अधिकार्‍यांनी सांगितले की, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या जयमीन यांना विमानात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली.

यावरून जयमीन यांनी एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांसोबत हुज्जतही घातली. त्यांना शिविगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*