गिर्यारोहणाबद्दलचे चित्तथरारक चित्रपट पाहण्याची नाशिककरांना संधी

0

नाशिक, ता. ३ : गिर्यारोहण म्हटला तर अवघड प्रकार; अनेकदा अवघड चढण करताना गिर्यारोहकांना जिवाची बाजी लावावी लागते.

याच गिर्यारोहणाचा थरार चित्रपटाच्या माध्यमातून नाशिककरांना अनुभवायला मिळणार आहे.

निमित्त आहे येत्या ३ जून २०१७ रोजी संपन्न होत असलेल्या ‘माऊंटेन फिल्म फेस्टिवल’चे. कालिदास कलामंदिरात सायंकाळी ७ ते १० या वेळेत हा महोत्सव होणार आहे.

गिर्यारोहणात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या नाशिकच्या वैनतेय ग्रुप आणि द हिमालयन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या अनोख्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन होत आहे.

गिरीप्रेमी आणि गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या, तसेच गिर्यारोहण करणाऱ्या नाशिककरांसाठी ही संधी असून त्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*