Type to search

धुळे

गिरीधारी रामराख्या यांच्या जामीन अर्जावर 29 जुलै रोजी उच्च न्यायालयात कामकाज

Share

दोंडाईचा । येथील नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत गैरव्यवहार झाल्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या जानेवारी पासून अटकेत असलेले पालिकेचे माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज दि 19 रोजी कामकाज झाले. त्यात फिर्यादी कृष्णा नगराळे यांच्या वतीने अफिडेव्हीट दाखल करण्यात येणार असल्याने न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर दि 29 जुलै रोजी कामकाज होणार आहे.

घरकुल गैरव्यवहार प्रकरणात जवळपास 15 कोटींचा व्यवहार खात्यावर झाल्याने तसेच हाय पॉवर कमिटीचे सदस्य असल्याने त्यांना पोलिसांनी जानेवारी महिन्यात अटक केली होती. इतर आरोपींना तात्पुरता जामीन मिळाला आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर गिरीधारी रामराख्या यांनी जामीन मागितला. परंतु व्यवहार मोठा असल्याने न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला. म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यांना जामीन मिळतो किंवा फेटाळला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याच गुन्ह्यातील संशयीत आरोपी असलेले डॉ. हेमंत देशमुख यांच्या जामीन अर्जावर देखील सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!