गिरणा पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त भांडारपालासह कुटूंबियांवर गुन्हा

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-भ्रष्टाचाराची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत विभागातर्फे गिरणा पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त भांडारपाल यांची चौकशी सुरु होती.
यामध्ये सेवाकाळात त्यांनी 20 लाख 27 हजार 166 रुपयांची अपसंपदा जमविल्याचे उघड झाले. त्यामुळे भगवान बोदडे यांच्यासह कुटुंबियांवर रामानंदनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गिरणा पाटबंधारे विभागाची लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गिरणा पाटबंधोर विभागात भांडारपाल या पदावर भगवान पुंजाजी बोदडे (रा.वाघनगर) कार्यरत होते. सन 2015 मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशान्वये जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक पराग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी सुरु होती.

या चौकशीमध्ये दि.7 मार्च 1980 ते दि.31 डिसेंबर 2008 या दरम्यान वेळोवेळी त्यांच्यासह कुटूंबियांच्या नावे त्यांनी अपसंपदा संपादीत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

यात 20 लाख 27 हजार 166 रुपयांची मालमत्ता त्यांनी जमविली. यासाठी त्यांची पत्नी अलका बोदडे व मुलगा दिलीप बोदडे यांनी अपसंपदा संपादीत करण्यासाठी भगवान बोदडे यांना साहाय्य केल्याचेही समोर आले आहे.

त्यामुळे सेवानिवृत्त भांडारपाल भगवान बोदडे यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंध कायदा कलम 13 (1) (ई) सह 13 (2) प्रमाणे व त्यांची पत्नी अलका व मुलगा दिलीप यांच्या विरुध्द भादंवि कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी जळगाव लाचलुचपत कार्यालयाने नाशिक पोलीस उपआयुक्त यांच्याकडे मागितली.

पोलीस उपआयुक्त यांच्या परवानगीने रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपअधिक्षक पराग सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन भगवान बोदडे, अलका बोदडे, दिलीप बोदडे यांच्याविरुध्द तक्रार देण्यात आली.

त्यांच्या तक्रारीवरुन भाग 6 गुरनं 3024/2017 लाचलुचपथ प्रतिबंधक कायदा कलम (13) (1) (ई) सह 13 (2) प्रमाणे व भादंवि कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*