गावठी कट्ट्यासह दोघांना अटक; विळद घाटातील घटना

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर-मनमाड रस्त्यावरील विळद घाटात बीडच्या दोघांना गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत अटक केली. कट्टा व जीवंत काडतूसे असा 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
आकाश सदाशिव वडमारे व रंजीत दिगंबर भोसले (रा. बीड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे आरोपी गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मिळाली होती. शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला सूचना देत विळद घाटात सापळा लावण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने पेट्रोलपंपाजवळ दोघां संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी उडवाउडविची उत्तरे दिली. पोलिसांनी आकाश वडमारे यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. नंतर पोलिसांनी गुन्हादाखल करत दोघांना बेड्या ठोकल्या. अटकेतील आकाश वडमारे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जिवघेणा हल्ला करणे, शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*