Type to search

जळगाव

गाळ्यांबाबत न्यायालयाने मागविली माहिती

Share

जळगाव । मनपात फुले, सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्यांसह इरिक्शनची कारवाईअंतर्गतच्या सर्व गाळ्यांबाबत जिल्हा न्यायालयाने माहिती मागविली आहे तसेच आपण आतापयर्र्त काय कारवाई केली याचीही माहिती उपायुक्त (महसूल) उत्कर्ष गुटे यांनी दिली.

2017 मध्येच गाळेधारकांविरोधात गाळे इरिक्शनची ऑर्डर निघालेली असतांना कार्पोरेशनकडून कारवाईस उशीर का झाला याची कारणे आता अ‍ॅफिडेव्हीटद्वारे आयुक्तांकडून मागविण्यात आले आहे. याच बरोबर इरिक्शनची कारवाईअंतर्गतच्या सर्व गाळ्यांबाबत जिल्हा न्यायालयाने माहिती मागवली असल्याने आता ही माहिती ही मनपातर्फे कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

कलम 81 बी च्या कारवाईत सुप्रिम न्यायालयाने 2017 मध्ये इरिक्शनची ऑर्डर काढलेली आहे. त्यानंतर काही गाळे धारक हे उच्च न्यायालयात गेले होते. मात्र तेथे त्यांची अपील फेटाळली गेली. त्यानंतर सुप्रिम कोर्टातही अपील फेटाळली गेली, शासनाकडूनही गाळेधारकांची अपील फेटाळण्यात आली आहे.

जे 5 गाळेधारक अलिकडेच कोर्टात गेलेले आहेत त्यांना प्रथम त्या जागेवरुन काढण्याची कारवाई केली जाईल असेही समजते. नंतर त्यांचेकडून नुकसानभरपाईचे पैसे वसूल केले जातील.81 बी अंतर्गत 2462 गाळेधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. यातील अर्धे लोक अजूनही पुढे येत नाहीत. तसेच 81 सी नुसार 1028 गाळेधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर बाकी किरकोळ गाळेधारक आहेत. महात्मा फुले सेंट्रल फुले मार्केट मधील एकूण 841 गाळेधारकांनी 28 कोटीच्या वर थकबाकी भरली आहे तर 121 गाळेधारक हे आपल्याकडील थकबाकी पूर्णपणे भरुन निल झालेले आहेत. यात 80 सेंट्रल फुले तर 41 महात्मा फुले मार्केटमधील गाळेधारकांचा सहभाग आहे. शाहूनगर कॉम्प्लेक्सचे गाळेधारक हे हायकोर्टात गेले होते. मात्र त्यांची अपील तेथेही फेटाळली गेली आहे.

655 गाळ्यांवर कारवाई 2017 च्या इरिक्शनच्या आदेशानुसार आता पुढील कारवाई तडफाकडकी केली जाणार आहे. मात्र आता पुढील कारवाईबाबत जिल्हा सत्र न्यायालय हे पुढील कारवाईसाठी उच्च न्यायालयाकडे अहवाल पाठविणार असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!