Type to search

जळगाव

गाळेधारकांविरोधात कारवाईसाठी तिघा उपायुक्तांची पथके तैनात होणार

Share

जळगाव । सोमवारी पोलिस बंदोबस्त विना उपायुक्त श्री. गुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गाळे सीलची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईप्रसंगी मोठा वाद निर्माण झाला होता. असा प्रकार होवू नये म्हणून आता मात्र यापुढील कारवाई ही मोठ्या पोलिस बंदोबस्तात होणार असून तिघे उपायुक्तांना यावेळी प्राधिकृत करण्यात आले असून तिघा उपायुक्तांची पथके तैनात केली जातील. तत्पूर्वी 22 रोजीच्या न्यायालयाच्या कामकाजात काय निर्णय होतो. याकडे मनपा प्रशासनासह गाळेधारकांचे लक्ष लागून आहे.

बुधवारी न्या. गोविंदा सानप यांनी गाळे ताब्यात घेण्याची सुप्रीम कोर्टाची 2017 मध्येच इरिक्शनची ऑर्डर असतांनाही गाळे ताब्यात घेण्याची कारवाई न केल्याने मनपावर ताशेरे ओढले होते. एखाद्याने याबाबत गुन्हा दाखल केला तर गाळे ताब्यात घेतले नसल्याबद्दल व मनपाचे व जनसामान्यांचे नुकसान केले म्हणून जेलमध्येही जावे लागेल असेही न्या. सानप यांनी त्यावेळी मनपाला बजावले होते. त्यामुळे आता पुढील कारवाईकडे सार्‍यांचेच लक्ष लागून आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 8 अ, कलम 81 ब ते 81 ई मधील तरतुदीनुसार गाळे रिक्त करणे आवश्यक आहे. जलदगतीने प्रकरणाचा निपटारा होणे आवश्यक आहे. तरी मनपाच्या जागातून व्यक्तिंना काढून टाकण्याबाबत कारवाईसाठी तिघे उपायुक्तांना अधिकार देण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार सुनावणी निर्णय देणे तसेच ही कामे शीघ्रतेने व कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी कलम 69 (1) मधील तरतुदीअंतर्गत व प्रस्तुतच्या आदेशासोबत जोडलेल्या अनुसूची भाग 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!