गाळमुक्त धरण योजना शेतीसाठी फायदेशीर

0

ना. राम शिंदे : संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे गाळ काढण्याचा शुभारंभ

तळेगाव दिघे (वार्ताहर) – महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजनेला जोडून लोकसहभागातून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना’ सुरू केली आहे. साठवण तलाव व धरणातील पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होणार असून शेतीसाठी दुहेरी फायदा होईल. ‘गाळमुक्त धरण’ योजना शेतीसाठी फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन जलसंधारण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे जलसंधारण विभागांतर्गत ‘गाळमुक्त धरण’ कामाच्या उद्घाटन प्रसंगी ना. शिंदे बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी अभय महाजन, थोरात सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, संचालक संपतराव गोडगे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, नाशिक मनपाचे भागवतराव आरोटे, बाबासाहेब कांदळकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष श्रीराज डेरे, राजाभाऊ सोनवणे, विठ्ठल घोरपडे, पुंजाभाऊ दिघे, अशोक इथापे, हरीश चकोर, अरुण इथापे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडल कृषीअधिकारी वसंत फिरोदिया, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गवारे, कृषी सहायक दत्तात्रय पोखरकर, जलसंपदा विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता गणेश हारदे, शाखा अभियंता आर. एम. सातपुते, कालवा निरीक्षक पी. के. आभाळे, के. के. लामखडे, इसाक शेख, दिलीप सोनवणे, निमोणच्या सरपंच सिंधुबाई मंडलिक, उपसरपंच शरद घुगे, अनिल घुगे, पिंपळेचे सरपंच भाऊपाटील कोटकर, उपसरपंच दत्तू ढोणे, दिलीप कदम, फारूक आत्तार, अण्णासाहेब चकोर आदी उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले, पाऊस चांगला झाल्यास जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण योजनेचा शेतीला फायदा होईल. शेतकर्‍यांनी धरणातील गाळ शेतीत टाकावा. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग देत ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रसंगी मंत्री प्रा. शिंदे यांनी निमोण व पिंपळे शिवारात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कृषी, लघू पाटबंधारे व वनविभागाने केलेल्या कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण साठवण बंधारा दुरुस्ती कामांची पाहणी केली. त्यानंतर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी चिंचोलीगुरव येथे भेट देत रमेश बळीराम गोडगे या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

*