गार येथील वनविभागाच्या हद्दीत स्फोटके आढळली

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील गार येथे भिमानदीपात्राच्या बाजूला वनविभागाच्या हद्दीत 17 हजार 500 रुपये किंमतीच्या बेवारस जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. याबाबत वनविभागाच्या कर्मचार्याने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय स्फोटक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

श्रीगोंदा वनविभागाचे वनपाल आप्पासाहेब रामभाऊ शिंदे हे काल दि. 10 रोजी साडेचार वाजता त्यांच्या सहकार्यानसह गार येथील भिमानदीपात्रालगत वनविभागाच्या हद्दीत गस्त घालत होते.

 

यावेळी त्यांना 17 हजार 500 रुपये किंमतीच्या बेवारस जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. त्यांचा पंचनामा करून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत शिंदे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात भारतीय स्फोटक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*