गारुडीकडून सुटका करतांना सर्पमित्राला सापाचा दंश

0

मोदलपाडा, ता.तळोदा । वार्ताहर- सापांचे खेळ दाखवितांना गारुडीच्या तावडीतून सापाची सुटका करतांना सर्पमित्राला सर्पदंश झाल्याची घटना तळोदा तालूक्यातील मोड या गावात घडली. दरम्यान, सर्प मित्रावर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले असून ते धोक्याचा बाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,मोड ता.तळोदा येथे आज दुपारच्या वेळेत एक गारुडी कोब्रा जातीचा सापाचा खेळ दाखवत होता. प्रकार सुरू असल्याची माहिती गावातील प्रमोद उत्तम पाटील या तरुणांस माहिती झाली.प्रदीप हा तालुक्यात सर्पमित्र म्हणून मागील 3 वर्ष भरापासून काम करतो.

सर्पमित्र असणार्‍या प्रमोदने जीवंत सापांचा खेळ दाखविणे चुकीचे असून अश्या प्रकारे साप सोबत ठेवू शकत नाही .त्याला तुम्ही जंगलात सोडा,असे सांगितले या विषयावरुन सर्पमित्र व गारुडी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.त्यामुळे तेथे गर्दी जमा झाली.या सर्व प्रकारात गारुडीकडील सापाने सर्पमित्र प्रमोद याला सापाने चावा घेतला. सापाने सर्पमित्राला चावा घेतल्यामुळे घाबरलेल्या गारुडीने साप तेथेच सोडून पळाला.

या प्रकारात साप देखील जखमी झाला.त्यानंतर सर्प मित्राला तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. सापाने चावा घेतल्याची माहिती मिळताच पर्यावरण अभ्यासक व महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते प्रा राजू यशोद यांनी तब्येतीची विचारपूस केली.शहाद्याचे सर्पमित्र सागर निकुंभे दीपक मोरे ,भीमराव रावताळे, जमादार यांनी देखील दवाखान्यात येऊन प्रमोदची भेट घेतली.

जखमी सापावर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ किशोर सामुद्रे यांनी सर्प मित्रांच्या मदतीने औषधपचार केले. वनविभागाचे नितीन रोढे, वनपाल आर जे शिरसाठ, यांनी दवाखान्यात जाऊन घडलेला प्रकार जाणून घेतला.शहाद्याच्या सर्पमित्राच्या सहकार्याने वनविभागाच्या कर्मचार्‍यानी सापाला जंगलात सोडले.

LEAVE A REPLY

*