गायिका बेगन परवीन सुलताना यांना आज जळगावात मिळणार जीवनगौरव पुरस्कार

0

जळगाव |  प्रतिनिधी : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आणि चांदोरकर प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दि.१७ ते १९ रोजी या कालावधीत जळगावातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात पं.भीमसेन जोशी स्मृतीशास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ज्येष्ठ गायिका बेगन परवीन सुलताना यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री तथा शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे, पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, जि.प.अध्यक्षा ना.प्रयाग कोळी यांच्यासह खा.ए.टी.पाटील, खा.रक्षाताई खडसे, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.डॉ.अपुर्व हिरे, आ.स्मिताताई वाघ, आ.चंदुलाल पटेल, आ.एकनाथराव खडसे, आ.डॉ.सतिष पाटील, आ.संजय सावकारे, आ.हरीभाऊ जावळे, आ.चंद्रकांत सोनवणे, आ.राजूमामा भोळे, आ.शिरीष चौधरी, आ.उन्मेष पाटील, आ.किशोर पाटील उपस्थित राहणार आहेत.

मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ गायिका बेगन परवीन सुलताना यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तीन दिवस शास्त्रीय संगीत महोत्सव

पं. भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दि. १७ ते १९ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ रोजी गायिका प्रिती पंढरपूरकर, गायिका सानिया पाटणकर, सतारवादक समीप कुलकर्णी आपली कला सादर करतील

तर दि. १८ रोजी गायक देबबर्ण कर्माकर, गायक धनंजय हेगडे व अभिषेक लाहिरी यांचे सरोदवादन होणार आहे. याच दिवशी बेगम परवीन सुलताना त्यांच्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करतील.

दि. १९ रोजी गायिका उन्मेषा आठवले, गायिका रुचिरा पंडा, बासरीवादक विवेक सोनार आपली कला सादर करतील.

LEAVE A REPLY

*