गळनिंब बंधार्‍यावरून टेम्पो पलटी; चालक जखमी

0

श्रीरामपूर – तालुक्यातील कुरणपूर येथून सकाळी दूध घेवून जाणारा टेम्पो गळनिंब-संक्रापूर येथील बंधार्‍याच्या पुलावरून पलटी होवून टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला. जखमी चालकाला श्रीरामपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील कुरणपूर येथील संकलन केलेले दूध राहुरीकडे नेले जाते. अशाचप्रकारे आज सकाळी दुध संकलन करून दूधाचा टेम्पो प्रवरा नदीवरील गळनिंब-संक्रापूर येथील बंधार्‍यावरून जात असतांना चालकाला कठड्याचा अंदाज न आल्याने नदीमध्ये पलटी झाला. यामध्ये चालक किरकोळ स्वरूपात जखमी झाला आहे. मात्र टेम्पोचे नुकसान झाले असून सर्व दूध नदीत पडून वाया गेले आहे. जखमी चालकाला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

*