गळनिंब, खंडाळा येथे दूध रस्त्यावर ओतले

0

बेलापूर, हरेगाव येथील आठवडे बाजारात शुकशुकाट

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप दुसर्‍या दिवसाअखेर मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊन संपला अशा बातम्या पसरल्यामुळे तालुक्यात काही ठिकाणी दूध संकलन केंद्रे सुरू होऊन आठवडा बाजार सुरू होणार, अशी चर्चा सुरू असतानाच संध्याकाळी पुन्हा संप मिटला नसल्याचे समजल्यावर तालुक्यात काल तिसर्‍या दिवशीही संपला चांगला प्रतिसाद मिळाला. हरेगाव, उंदिरगाव, बेलापूर येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले होते. तर उक्कलगाव,गळनिंब, खंडाळा, नांदूर या भागात शेतकर्‍यांनी दूध व कांदे रस्त्यावर ओतून शासनाचा जाहीर निषेध केला.

 

 
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा तसेच राहाता तालुक्यातील नांदूर येथील शेतकर्‍यांनी पुन्हा संपात सक्रीय सहभाग घेतला असून शासनाच्या निषेधार्थ दूध रस्त्यावर ओतून त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. या परिसरातील दूध संकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली होती.

 

 
शनिवारी रात्री काही शेतकरी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर संप मिटला अशा बातम्या पसरल्यानंतर काल सकाळी दूध उत्पादकांनी दूध संकलन केंद्रावर घातले. नंतर मात्र पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला. काल सकाळी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतून आपला निषेध व्यक्त केला. तसेच आज सकाळी कांदा व दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निर्णय मान्य नसल्याचे दाखवून देणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्‍वर सोडणार यांनी सांगितले.

 

या संपात विजय सदाफळ, सोसायटीचे अध्यक्ष सुनील ढोकचौळे, महेश मरकडे, संजय ढोकचौळे, राजेंद्र मुंढे, दिनकर सदाफळ, सतीश शिरसाठ, अमोल शिंगोटे, पप्पू सोडणार, नामदेव लोणारे, शशि डेंगळे, बाळासाहेब पुरोहीत, अजय ढोकचौळे, राजेंद्र सदाफळ, आबा ढोकचौळे, शिवाजी ढोकचौळे, शिवाजी ढोकचौळे, जयराम नवघारे, विनोद पवार, महेश ढोकचौळे, योगेश ढोकचौळे आदींसह शेतकरी सहभागी झालेले आहेत.

 

 
तसेच तालुक्यातील बेलापूर, हरेगाव, उंदिरगाव याठिकाणी रविवारी आठवडे बाजार असतात परंतु बाजाराच्या ठिकाणी पूर्णपणे शुकशुकाट होता. याठिकाणी शेतकर्‍यांनी पूर्णपणे बंद पाळत शासनाचा निषेध केला. तसेच उक्कलगाव, मातापूर, पढेगाव, कारेगाव, भोकर, खोकर आदींसह तालुक्यातील दूध संकलनकेंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.

 

 
तालुक्यातील गळनिंब येथेही शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. यावेळी श्रीरामपूर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती अण्णासाहेब शिंदे, मुळा प्रवराचे माजी संचालक जिजाभाऊ वडितके, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र गवळी, कैलास ऐनोर, पत्रकार प्रा. बाळासाहेब वडितके, जयप्रकाश वडितके, शुभम ऐनोर, सौरभ वडितके, दादा जाटे, कैलास मारकड, विष्णू चिंधे, शुभम गवळी, प्रकाश जाटे, संजय बाहुले, उपसरपंच दशरथ चिंधे, श्रावण वडितके, दत्तात्रय जाटे, सुभाष थोरात, संजय वडीतके आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*