गळतीमुळे ‘दारणा’तून हजारो लिटर पाणी वाया

0

कवडदरा | दि. २ वार्ताहर- धरणांचा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याकडे पाहिले जाते. दारणा धरणाच्या ५२ पैकी अनेक गेटमधून गेल्या एक महिन्यापासून पाण्याला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होऊन दारणा धरण भरले होते. मात्र धरणातून हजारो लिटर वाया जाणार्‍या पाण्यातून मुख्य जलसाठ्यावर परिणाम होत असल्याने पाणीटंचाईचे सावट निर्माण होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच पूर्व भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. आताच जर उर्वरित जलसाठ्यामधील पाणी वाहून गेले तर येणार्‍या परिस्थितीला मोठे तोंड द्यावे लागू शकते.

धरणाची निर्मिती झाल्यापासून गेल्या शतकापासून दारणा धरणामधील गाळ काढला नाही. त्यातील पाण्याचे घटते प्रमाण चिंताजनक आहे.

दरम्यान, धरणाच्या जवळ राहणार्‍या महिलांना दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते. या पार्श्‍वभूमीवर सदर गळती थांबवण्याची मागणी पूर्व भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

उपाययोजना कराव्या
गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून ते तात्काळ बंद करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाण्याची आताच बचत केल्यास दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा फायदा होईल. असे न केल्यास शेतकर्‍यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.
– शांताराम सहाणे, ग्रा.पं. सदस्य साकूर

LEAVE A REPLY

*