गर्लफ्रेण्डला थांबवण्यासाठी ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती, बॉयफ्रेंडला अटक

0

प्रेमात पडलेल्या एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेण्डसाठी पोलिस आणि रेल्वे यंत्रणेला वेठीस धरले.

गर्लफ्रेण्डचे वडील तिला बळजबरीने उत्तर प्रदेशला नेत असल्यामुळे तिला रोखण्यासाठी तरुणाने ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली.

उत्तर प्रदेशला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बॉम्ब पेरल्याचा खोटा फोन कॉल तरुणाने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला केला.

पोलिस आणि रेल्वे यंत्रणा तातडीने कामाला लागल्या, तेव्हा ही अफवा असल्याचं समोर आले.

LEAVE A REPLY

*