गर्भवती महिलांसाठी मोदींची महत्वपूर्ण घोषणा

0

नोटाबंदीसारखा ऐतिहासिक निर्णय भ्रष्टाचार रोखण्यासाठी तसेच काळ्यापैशाला आळा घालण्यासाठी घेतल्यानंतर मोदी सरकारने आता गर्भवती महिलांच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

देशभरात मातृत्व योजनेचा फायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे गर्भवती महिलांना गर्भावस्थेच्या काळात व बाळाच्या जन्मानंतर महिलेला आराम व पौष्टिक आहार मिळण्यास मदत होणार आहे. या योजने अंतर्गत मुलांना स्तनपान करणा-या मातांना ६००० रुपये जमा दिले जाणार आहेत. पण केवळ पहिल्या अपत्यासाठीच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

पहिल्या बाळाच्या जन्मावेळी गर्भवती महिलांना ६००० रुपये दिले जाणार आहेत. यापैकी ५००० रुपयांची रक्कम तीन टप्प्यांत दिली जाईल. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून गर्भवती आणि स्तनपान करणा-या महिलांना थेट बँक खात्यात ही रक्कम तीन टप्प्यांत दिली जाणार आहे. गर्भवती महिलांना गर्भावस्थेत नाव नोंदणी केल्यानंतर १००० रुपये दिले जाणार आहे. यानंतर सहा महिन्यांच्या गर्भधारणेनंतर २००० रुपये दिले जातील आणि बाळाच्या जन्मानंतर नाव नोंदणी केल्यावर २००० रुपये मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

*