गरोदर महिला सिंहगडावरुन दरीत पडली; स्थानिकांनी दीड तासाने बाहेर काढले

0

सिंहगडावर सेल्फी घेताना आठ महिन्यांच्या गरोदर महिला 150 फूट खोल दरीत पडली.

28 वर्षीय प्रणिता इंगळे आपल्या पती आणि भावासह सिंहगडावर गेली होती.

सेल्फी घेताना प्रणिताचा तोल गेला आणि ती 150 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ज्या ठिकाणी ती पडली तिथे घनदाट झाडी होती. स्थानिकांनी दीड तासाने तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. प्रणिता आणि बाळ सुरक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

स्थानिक नागरिकांनी तिला तब्बल दीड तास अथक परिश्रम घेऊन बाहेर काढले.

प्रणिताचा पती लहू इंगळे एक टूर ऑपरेटर आहे.

LEAVE A REPLY

*