गणित-विज्ञान प्रदर्शनातून तीस विद्यार्थी जिल्हास्तरावर

0

पारनेरच्या प्रदर्शनात 375 उपकरणांचा सहभाग; प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद

 

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित 43 व्या विज्ञान-गणित, पर्यावरण व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनातील 375 उपकरणापैकी तीस उपकरणाची जिल्हास्तरावर होणार्‍या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. तीन दिवस चाललेल्या प्रदर्शनाला तालुक्यातील विविध शाळांमधूल विद्यार्थ्यांनी व पालकांनी भेटी देवून उपकणांची माहिती घेतली.

 

प्रदर्शनामध्ये मांडलेल्या उपकराणामधून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात शाळेचे नाव व उपकरणाचे नाव)- गट 1 ली ते 5 वी विज्ञान- प्रथम ऐश्वर्या हरिभाऊ कोल्हे (न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर. ‘वाहतूक व दळणवळण’), द्वितीय भार्गवी महेश शिरोळे (जि. प. प्राथमिक शाळा, ‘झाडाचे उपयोग’), तृतीय समर्थ मच्छिंद्र कोल्हे (जि. प. शाळा, लोणी हवेली. ‘हॅण्ड वॉश सेंटर’).

 

गट 1 ली ते 5 वी गणित- प्रथम सिद्धी दिलीप बेलोटे (मुलिकादेवी विद्यालय, निघोज. ‘सहज सोपे मापन रूपांतरण’), द्वितीय समिक्षा चंद्रकांत घट (पारनेर पब्लिक स्कूल, ‘असेंडींग अ‍ॅण्ड डिसेंडींग ऑर्डर’), तृतीय सार्थक संतोष मांडगे (न्यू इंग्लिश स्कूल पारनेर, ‘पंधरा ते चोवीस टेबल चक्र’).

 

6 वी ते 8 वी विज्ञान- प्रथम निकिता राजेंद्र लोंढे (न्यू इंग्लिश स्कूल पारनेर, ‘कचर्‍यापासून जैविक खतनिर्मिती’), ऋषिकेश शिवाजी गागरे (नूतन माध्यमिक विद्यालय, खडकवाडी, ‘सोलर कार’), तृतीय यश बाळासाहेब व्यवहारे (जि. प. प्राथमिक शाळा किन्ही, ‘छत पाणी संकलन’).

 

6 वी ते 8 वी गणित- प्रथम दिव्या गीताराम औटी (श्रीसंत निळोबाराय विद्यालय राळेगणसिद्धी, ‘कृतीयुक्त अध्ययन’), द्वितीय आभा महेश शिरोळे (श्री साईनाथ हायस्कूल, अळकुटी, ‘हसत खेळत गणित’), तृतीय दीपक रामदास वाघ (आयझॅक पब्लिक स्कूल भाळवणी, ‘पास्कल त्रिकोण’).

 

9 वी ते 12 वी विज्ञान- प्रथम प्रथमेश भाऊसाहेब बोर्डे (न्यू इंग्लिश स्कूल पारनेर, ‘स्वयंचलित पाणी वितरण पद्धती’), द्वितीय शुभम संजय येणारे (न्यू इंग्लिश स्कूल सुपा, ‘स्मार्ट हेल्मेट’), तृतीय सौरभ बाळू गुंड (मुलिकादेवी विद्यालय निघोज, ‘सिंपल मशीन ऑफ अ‍ॅग्रिकल्चर’).
9 वी ते 12 वी गणित- प्रथम सायली संजय कदम (श्रीसंत निळोबाराय विद्यालय राळेगणसिद्धी, ‘वर्किंग मॉडेल इन जॉमेट्री’), द्वितीय ओंकार शिवाजी गोडसे (जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा, ‘मॅजिक ऑफ टिगनॉमॅट्री’), तृतीय सुरज सावकार काकडे (न्यू इंग्लिश स्कूल पारनेर, ‘अलाइड अँगल’).

 

1 ली ते 8 वी शिक्षक -शैक्षणिक साहित्य- प्रथम जालिंदर तुळाजी आहेर (हरेश्वर विद्यालय कर्जुले हर्या, ‘मल्टीपर्पज मल्टीस्टॅन्डर्ड मिरर’), द्वितीय आशाबाई कान्हू लाळगे (जि. प. प्राथमिक शाळा कडूस, ‘हसतखेळत भागाकार शिकणे’), तृतीय संतोष बाबूराव कोकाटे (जि.प. प्राथमिक शाळा कडूस, ‘आनंददायी ज्ञानरचना वाद’).

 

9 वी ते 12 वी शिक्षक शैक्षणिक साहित्य- प्रथम अजित किसन दिवटे (न्यू इंग्लिश स्कूल पारनेर, ‘अल्ट्रा मॉर्डन पिरॉडिक ग्लोब’), द्वितीय हरिभाऊ कुंडलिक गुळवे (श्रीसंत निळोबाराय विद्यालय राळेगणसिद्धी, ‘युज ऑफ जिओ झेबा फॉर मॅथेमॅटिकल टिचींग’), तृतीय कविता आश्रु शेलार (श्रीमळगंगा विद्यालय निघोज, ‘ध्वनीतरंग व डी. एन. ए. मॉडेल’).

 

लोकसंख्या शिक्षण प्राथमिक- प्रथम संजय किसन पवार (जि.प. प्राथमिक शाळा कान्हूरपठार, ‘लोकसंख्या शिक्षण’), द्वितीय संतोष बापुराव कोकाटे (जि. प. प्राथमिक शाळा कडूस, ‘प्लास्टिक कचरा एक समस्या’).

 

लोकसंख्या शिक्षण माध्यमिक- प्रथम हरिभाऊ कुंडलिक गुळवे (श्रीसंत निळोबाराय विद्यालय राळेगणसिध्दी, ‘पर्यावरण’).

 

प्रयोगशाळा परिचर- लहू दशरथ रणशूर (श्रीखंडेश्वर विद्यालय पिंपळगाव रोठा, ‘जमीन दोस्त’).

LEAVE A REPLY

*