गडाखांच्या ‘क्रांती’ला बहुमत

0

नगराध्यक्ष मात्र भाजपाचा

नेवासा (प्रतिनिधी)- येथील नगरपंचायतच्या बुधवार 24 रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी काल झाली. 17 जागांच्या या नगरपंचायतीत गडाखांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाने 9 जागा जिंकत बहुमत प्राप्त केले असले तरी नगराध्यक्ष पदाच्या अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघात (प्रभाग 17) भाजपाच्या उमेदवाराने विजय मिळवल्याने येथे नगराध्यक्ष भाजपाचा होणार आहे. भाजपाने एकूण 6 जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसने 1 व अपक्षाने 1 जागा जिंकली. शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेला एकही जागा जिंकता आली नाही.

नेवासा नगरपंचायतीत कोणाची सत्ता येते याबाबत उत्सुकता होती. मात्र येथील जनतेने कोणालाही मोठा आनंद मिळू दिला नाही तसेच कोणाला नाराजही न करण्याची किमया साधली.

प्रभागनिहाय उमेदवार व मिळालेली मते
प्रभाग-1- विजयी- योगिता सतिष पिंपळे (क्रांतीकारी)- 388 पराभूत- शरदिनी मधुकर देशपांडे भाजप -249, अर्चना संतोष गव्हाणे (मनसे) 09.
प्रभाग 2- विजयी -शालिनी संजय सुखदान (काँग्रेस)-574, पराभूत- अनिता प्रल्हाद चक्रनारायण (क्रांतीकारी)-135, ललिता बहिरू चक्रनारायण (अपक्ष)-18.
प्रभाग 3- विजयी- लक्ष्मण गणपत जगताप (क्रांतीकारी)- 344, पराभूत- नितीन सुरेश दिनकर (भाजप)-325, विलास दत्तात्रय कडू (राष्ट्रवादी)-27, कैलास पोपट जिरे (शिवसेना)- 59, जानकीराम घनःश्याम डौले (अपक्ष)-58, निखील सुनील शिंगवी (अपक्ष)-110, बाळासाहेब विठ्ठल सावंत (अपक्ष)-26.
प्रभाग-4 विजयी-अनिता भारत डोकडे (अपक्ष)-220, पराभूत- पुनम संदीप घोंगडे (क्रांतीकारी)-219, नम्रता विलास बोरुडे (भाजप)-188, निर्मला विष्णू नवसे (अपक्ष)-47.
प्रभाग-5- विजयी सचिन जगदीश नागपुरे (भाजप)-171, पराभूत- वैभव गणपत वाघचौरे (क्रांतीकारी)-169, मुजफ्फर राजू शेख (अपक्ष)-48.
प्रभाग -6- विजयी-अर्चना जितेंद्र कुर्‍हे (क्रांतीकारी)-369, पराभूत- सुरेखा नितीन जगताप (शिवसेना)-247, अनिता विनायक ताठे (राष्ट्रवादी)-53, राधा शंतनू सुर्यकर (भाजप)-72.
प्रभाग-7-विजयी-निर्मला सचिन सांगळे (भाजप)-198, पराभूत- सरस्वती दिलीप फटांगरे (क्रांतीकारी)-153, जनाबाई सूर्यभान लष्करे (शिवसेना)-184, फरहाना राजू शेख (अपक्ष)-17, अमिता विजय नहार (अपक्ष)-5.
प्रभाग 8- विजयी-सचिन फिलीप वडागळे (क्रांतीकारी)-379, पराभूत-नानासाहेब छबुराव शेंडे (भाजप)-119.
प्रभाग 9-विजयी- रणजित दत्तात्रय सोनवणे (भाजप)-102, पराभूत- राम रेणूकादास घोलप (क्रांतीकारी)-100, नीरज विलास नांगरे (शिवसेना)-22.
प्रभाग-10-विजयी- अंबिका अंबादास इरले (405), पराभूत- मुक्ताबाई शांताराम गायके (शिवसेना) 184, भामाबाई भास्कर कणगरे (भाजप)-59.
प्रभाग-11 विजयी- संदीप अण्णासाहेब बेहळे (क्रांतीकारी)-267, पराभूत- निरंजन कृष्णा डहाळे (भाजप)-236, दिपक शंकर इरले (शिवसेना)-171, योगेश सुर्यकांत रासने (राष्ट्रवादी)-83.
प्रभाग-12- विजयी- नंदकुमार लक्ष्मणराव पाटील (क्रांतीकारी)-507, पराभूत-सुनील पंडितराव वाघ (भाजप)-460, मनोज अंबादास पारखे (अपक्ष)-50, सतीश देवराव गायके (अपक्ष)-5.
प्रभाग-13 विजयी-फेरीजबी इमामखान पठाण (क्रांतीकारी)-293, नसरीन मुक्तार शेख (भाजप)-229, ज्योती ज्ञानेश्‍वर काळे (शिवसेना)-47, कमल ज्ञानदेव डहाळे (अपक्ष)-1, हर्षा राजेंद्र पोतदार (अपक्ष)-26.
प्रभाग-14-विजयी-सिमा राजेंद्र मापारी (भाजप)-347, मनिषा अमित मापारी (क्रांतीकारी)-215, खुर्शिद इसाक मनीयार शेख (अपक्ष)-222, सविता दत्तात्रय नागे (अपक्ष)-24.
प्रभाग 15- विजयी-दिनेश प्रताप व्यवहारे (भाजप)-430, पराभूत- गोरक्षनाथ नामदेवराव व्यवहारे (क्रांतीकारी)-101
प्रभाग 16- विजयी-फारुक हाजी कासम आतार (क्रांतीकारी)-374, पराभूत- वसीम गनी चौधरी (भाजप)-368, गोरख लहानू घुले (शिवसेना)-135.
प्रभाग 17- विजयी संगीता दत्तात्रय बर्डे (भाजप)-355, पराभूत- राणी किशोर बर्डे (क्रांतीकारी)-152, वर्षा मारुती पवार (शिवसेना)-71, आशा भाऊसाहेब पवार (मनसे)-09.

LEAVE A REPLY

*