गंभीरच्या टीकेला विराटचे सडेतोड प्रत्युत्तर

0
चेन्नई । भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर टीका केली होती. ‘विराट कोहली हा चतूर कर्णधार नाही, त्यामुळे त्याची तुलना धोनी किंवा रोहित शर्माशी होऊ शकत नाही. कोहलीने बंगळुरू टीम प्रशासनला धन्यवाद दिले पाहिजेत, कारण तो अजूनही बंगळुरूच्या टीमसोबत आहे. स्पर्धा न जिंकणार्‍या कर्णधारांना एवढा वेळ दिला जात नाही’, असे गंभीर म्हणाला होता. गौतम गंभीरच्या या टीकेला आता विराट कोहलीने प्रत्युत्तर दिले आहे.

‘बाहेर बसलेली लोके काय म्हणत आहेत याचा विचार करत बसलो असतो, तर मला घरीच बसावे लागले असते, असे उत्तर विराटने दिले. ‘निश्चितच तुम्ही आयपीएल जिंकायचा प्रयत्न करता. माझ्याकडून ज्याची अपेक्षा आहे तेच मी करतो. आयपीएल जिंकल्याबद्दल किंवा न जिंकल्याबद्दल होणार्‍या टीकेची मी पर्वा करत नाही. आपले सर्वश्रेष्ठ देण्याचा मी प्रयत्न करतो. प्रत्येक स्पर्धा जिंकण्याचा मी प्रयत्न करतो, पण प्रत्येकवेळी असे होत नाही,’ अशी प्रतिक्रिया विराटने दिली. ‘आम्हाला आयपीएल का जिंकता आली नाही याचा आम्हाला व्यावहारिक विचार करायला हवा. दबावात असताना खराब निर्णय घेतल्यामुळे असे झाले. जर मी बाहेर बसलेल्यांसारखा विचार करायला लागलो, तर मी पाच मॅचही खेळू शकलो नसतो आणि घरी बसलो असतो,’ असे टोला विराटने गंभीरला हाणला.

काय म्हणाला होता गंभीर?
‘आयपीएलमध्ये धोनी आणि रोहितने तीनवेळा ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे विराटला अजून मोठे अंतर कापायचे आहे. याबाबतीत तुम्ही विराटची तुलना रोहित किंवा धोनीशी करु शकत नाही,’ असे वक्तव्य गंभीरने केले.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आणि रोहितच्या नेतृत्वात मुंबईने आत्तापर्यंत तीन-तीन वेळा आयपीएल जिंकले आहे. तर विराटच्या नेतृत्वात खेळणार्‍या बंगळुरूला एकदाही आयपीएल जिंकता आले नाही. गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वात कोलकाताला 2012 आणि 2014 साली आयपीएलमध्ये विजय मिळवून दिला होता.

LEAVE A REPLY

*