खोसपुरी शिवारात तरूणाचा खून

0

 मृतदेह जाळला : तपास सुरु

अहमदनगर (प्रतिनिधी) – पहाटेच्या नगर- औरंगाबाद  रोडवरील  खोसपुरी शिवारातील हॉटेल सिंहगडशेजारी 35 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह खून करून जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

या मृतदेहाच्या अंगावर गुलाबी रंगाचा फुल शर्ट, काळ्या रंगाची पॅट व हातावर आर. एम. गोंदल्याचे मृतदेहाच्या अंगावर आढळून आले.

या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नसून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनस्थळी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील, नगर ग्रामिणचे उपअधीक्षक आनंद भोईटे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

वेगाने तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

LEAVE A REPLY

*