खोसपुरीतील मयताची ओळख पटली; 6 संशयित ताब्यात

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर-औरंगाबाद रोडवरील हॉटेल सिंहगड परिसरात एका 36 वर्षीय पुरूषाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता.

त्याची ओळख पटली आहे.

तो इमामपुरचा रहिवासी आहे.

याबाबत एम.आय.डी.सी पोलिसांनी तपास करून सदर व्यक्ती रावसाहेब सदाशिव मोकाटे रा.इमामपूर येथील असून त्यांचा खून करून जाळून टाकण्यात आले. त्यांचा मृतदेह खोसपुरी शिवारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. या प्रकारणी पोलिसांनी परिसरातील संशयीत व्यक्तीची चौकशी करण्यात सुरुवात केली आहे.

एम.आय.डी.सी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हान नगर टाइम्सशी बोलतांना सांगितले की, सदरील व्यक्तीची ओळख पटली आहे. परिसरातील काही संशयीत व्यक्तीची चौकशी करत असून परिसरातील 6 संशयीत व्यक्तींना तब्यात घेतले आहे. याप्रकरणी लवकरात लवकर आरोपीना अटक करून त्यांना बेड्या ठोकण्यात येईल असे चव्हाण यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*