खेरवाडी-ओढा स्टेशनदरम्यान मालगाडीचे इंजिन फेल ; मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

0

मनमाड(बब्बू शेख) : नाशिक जवळ खेरवाडी-ओढा रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मालगाडीचा इंजिन फेल झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पंचवटी एक्स्प्रेस खेरवाडी स्टेशनवर खोळंबळी होती. तर इतर काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या. सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे रेल्वेत प्रचंड गर्दी असून गाड्यांचा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. मनमाड जवळ इंजिन फेल होण्याची एका आठवड्यात ही दुसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

*