खुशखबर : स्पेलिंग वेगळे असले तरी आधारला लिंक करता येणार पॅनकार्ड

0

नवी दिल्ली दि. ३ :  ज्यांचे आधारकार्ड वरील नावाचे स्पेलिंग आणि पॅन कार्डवरील नावाचे स्पेलिंग जुळत नाही त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे.

असे नावाचे स्पेलिंग वेगळे असणाऱ्यांनाही आता पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडता येणार आहे. यासंदर्भातील लिंक आयकर विभागाच्या वेबसाईटवर सुरू झाली आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार आयकर विभागाने पॅनकार्डला आधारकार्ड जोडणे अनिवार्य केले असून जुलै २०१७च्या आत पॅनला आधारकार्ड जोडणे बंधनकारक आहे. अन्यथा आपले पॅनकार्ड बंद केले जाऊ शकते.

तसे झाल्यास या वर्षीचे इंकम टॅक्स रिटर्न दाखल करता येणार नाही. इतरही अडचणींना करदात्याला तोंड द्यावे लागणार.

 पॅन कार्ड आधार कार्डला असे लिंक करा

  • आयकर विभागाच्या https://incometaxindiaefiling.gov.in/ वेबसाईटला जा.
  • आपल्या नावाने लॉग इन करा
  • प्रोफाईलमध्ये सेटिंगमध्ये जाऊन Link Adhar वर क्लिक करा. त्यात आपला आधार क्रमांक व नाव लिहून submit बटन दाबा.
  • आधार लिंक झाल्याचा संदेश येईल.

LEAVE A REPLY

*