Type to search

जळगाव

खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

Share

जळगाव । भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन्ही भावावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात खूनाचा कलम वाढविण्यात आला होता. अटकेत असलेल्या सातही संशयिताच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.

गांधी नगर भागात लिगोरी खेळतांना देवेन चौधरी यांचा काही तरुणांशी वाद झाला होता.यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेले सुमित बोरसे व राहुल बोरसे या दोन्ही भावांवर चेतन भालेराव, आकाश सपकाळे, विजय बाविस्कर, रा. तिघे विवेकानंद नगर, दर्शन जैन, अंकित धर्माधिकारी, हर्षद जैन, संकेत पाडे रा. सर्व गांधीनगर यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमित बोरसे व राहुल बोरसे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान सुमित बोरसे याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात या गुन्ह्यात खूनाचा कलम वाढविण्यात आला होता. या गुन्हयात सर्व संशयितांना पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना दि.26 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. आर.पी. गावित यांनी कामकाज यांनी पाहिले.

गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षकांकडे वर्ग
तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्याकडे होता. दरम्यान संशयितांना तपासात सुट व सवलतीची वागणूक दिली जात होती. तसेच संशयित दर्शन जैन याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करतांना पोलीस कर्मचार्‍याच्या मोटारसायकलीवरून नेण्यात आले होते. तसेच संशयितांना पोलीस कोठडीत असतांना आंब्याचा रस व पुरणपोळीचा आस्वाद देण्यातही पोलीसांनी सुट दिली होती. या प्रकाराबाबत मयताच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर या गुन्हयाचे तपासधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्याकडून या गुन्ह्याचा तपास काढून घेण्यात आला आहे. आता हा तपास पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!