Type to search

maharashtra नंदुरबार

खुंटामोडी येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन सत्र

Share
मोलगी ता. अक्कलकुवा ।  वार्ताहर- माध्यमिक विदयालय खुंटामोडी ता. धडगाव येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आल होतेे.परिसरातील विदयार्थ्यांमधे स्पर्धा परिक्षेविषयी जागृकता निर्माण व्हावी व स्पर्धा परिक्षेविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेत एकुण 173 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

इ.5वी ते 10 वी पर्यंत लहान गट व इ.11 पासुन पुढील वर्गासाठी मोठा गट असे दोन गट तयार करण्यात आले.स्पर्धा परिक्षेनंतर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.बॅक आफ इंडिया शाखेचे निवृत्त शाखाधिकारी रायसिंग वळवी यांनी एमपीएससी व युपीएससी चे प्रारुप समजावुन सांगितले प्राध्यापक राकेश वळवी यांनी स्पर्धेत कसे टिकुन राहावे व आजच्या काळात स्पर्धा परिक्षा किती महत्वाची आहे याबाबत महत्व पटवुन दिले.गंगाराम परमार ,मालसिंग वळवी शाळेचे मुख्याध्यापक सुकलाल वळवी ,दिलीप परमार, दिलवरसिंग वळवी यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोठया गटात प्रथम क्रमांक नटवर बिजला पाडवी, व्दितीय दिलीप बिज्या वळवी, तृतीय अरुण शिवाजी वसावे यांनी पटकावला तर लहान गटात प्रथम नटवर मालसिंग तडवी,व्दितीय ऋषीकेश राजेंद्र वळवी , तृतीय क्रमांक नितेश दिलीप पराडके यांनी पटकावला परिक्षार्थी विदयार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रथम एक हजार व्दितीय पाचशे रुपये व तृतीय दोनश पन्नास या प्रमाणे बक्षीस वितरीत कण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!