खासदार पप्पू यादवांचा नक्षलवाद्यांना वादग्रस्त सल्ला

0

दोन दिवसांपूर्वी खासदार पप्पू यादव (राजेश रंजन) वादग्रस्त वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नक्षलवाद्यांनी जवानांची हत्या करण्यापेक्षा राजकीय नेत्यांची हत्या करणे चांगले, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

पाटणातील बेऊर तुरूंगात तीन आठवड्याच्या कैदेतून ते नुकतेच परतले.

त्यानंतर पप्पू यादव यांनी सुकमा येथील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील हुतात्मा जवान नरेश यादव यांच्या कुटुंबियांची दरभंगा येथे भेट घेऊन त्यांना ५० हजार रूपयांची आर्थिक मदत केली. त्याचबरोबर हुतात्मा यादव यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च करण्याची जबाबदारीही घेणार असल्याचे जाहीर केले.

यादव कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नक्षलवाद्यांनी जवानांना नव्हे तर राजकीय नेत्यांना संपवले पाहिजे. जे देशाची व्यवस्था चालवत आहेत, अशा राजकीय नेत्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली पाहिजे.

LEAVE A REPLY

*