खासगी डॉक्टरांचा संप सुरूच; सरकारी डॉक्टर कामावर

0

नाशिक, ता. २४ : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा म्हणून राज्यातील ४० हजार आयएमए सदस्य असलेल्या डॉक्टरांसह शहरातील १५०० डॉक्टरांचा संप आजही सुरूच आहे.

अनेक रुग्णालयातील आपात्कालिन कक्षासह बाह्यरुग्ण विभाग आजही बंद राहणार आहेत.

आपल्या मागण्यांसाठी डॉक्टर आज मोर्चा काढणार आहेत.

या सर्व प्रकारामुळे सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत.

मार्डने दिलेल्या आश्वासनानंतर निवासी डॉक्टर आजपासून कामावर रुजू होणार असल्याने सर्व वैद्यकिय महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचार मिळू शकणार आहे.

दरम्यान नाशिक शहर व जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपालिका व महापालिका रुग्णालयांमधील डॉक्टर्स संपात सहभागी नसल्यामुळे ही रुग्णालये सुरू आहेत.

LEAVE A REPLY

*