खडी क्रशरचा वाद पेटला

0

उक्कडगाव : 23 जणांवर गुन्हे

बुर्‍हाणनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील उक्कडगाव येथे खडी क्रशरचा वाद पुन्हा पेटला आहे. खडी क्रशरमुळे घरांना तडे जातात, विहीरींचे पाणी जाते, धुळ, आवाज या कारणांमुळे नागरिकांना त्रास झाले आहे. त्यामुळे खडी क्रेशरची मशीन सुरू केल्यास जाळून टाकू व सुरू करणार्‍यांचा बेत पाहु असे म्हणत बाळासाहेब शकंर काळे (रा. सारोळा कासार) यांना शिवीगाळ दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी राम शेळके यांच्यासह 23 जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब काळे (रा. सारोळा कासार) हे उक्कगाव येथील खडीक्रशर कामावर सुपरवायझर म्हणुन काम करतात. सोमवारी (दि.22) दुपारी तीनच्या सुमारास ते कामावर गेले होते. त्यावेळी तेथे गावातील 20 ते 25 नागरिक आले. त्यांनी खडीक्रेशर चालु करण्यास विरोध केला. काळे यांना ग्रामस्थांना समजूत सांगण्याचा प्रयत्न केला असता, शेळके यांनी गावातील मंडळी जामवुन काळे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच मशिन सुरू केली तर ती जाळून टाकू, तसेच काम करण्यासाठी आलेल्या कामगारांना आरोपींना धमकी देऊन दहशत निर्माण केली. यापुढे कामावर आले तर तुमचा बेत पाहु असे म्हणून त्यांना दमदाटी केली.
दरम्यान, बिघडलेली मशिन निट करण्यासाठी आलेल्या कामगारांनाही दमदाटी करण्यात आली. तुमच्या खडी क्रेशरमुळे आमच्या विहीरींचे पाणी जाते, खाणीच्या खोदकामामुळे घराच्या भिंतींना भेगा पडतात अशी अनेक कारणे सांगून काळे यांच्यासह कर्मचार्‍यांना घटनास्थळाहुन हुसकावुन देण्यात आले. याप्रकरणी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. पुढील तपास बी. एन. गायकवाड करीत आहेत.

कायदा हातात घेऊ नये
उक्कडगाव येथे यापूर्वी खडीक्रेशवर वरून वाद झालेला आहे. गावातील ग्रामस्थांनी महसुल शाखेत पत्र देत खडी के्रशर बंद करण्याची मागणी केलेली आहे. त्यावर प्रशासनाने योग्य तो तोडगा काढणे आवश्यक आहे. शिवीगाळ दमदाटी व मारहाण करुन कायदा हातात घेणे योग्य नाही. उक्कडगावप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कायद्यानूसार कारवाई होईल.ग्रामस्थांना कायदा हातात घेऊ नये.
राहुल पाटील (सहायक पोलीस निरीक्षक)

महसुलापेक्षा माणूस महत्त्वाचा
प्रशासन नागरिकांसाठी आहे. नागरिकांना त्रास होईल अशी कामे त्यांनी करणे चूक आहे. नगर तालुक्यात सर्वाधिक गैणखनिजाची ठिकाणे आहेत. त्यातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, खडी क्रशरमुळे नागरिकांच्या घरांना तडे जातात, शेतकर्‍यांच्या विहीरीचे पाणी जाते, धुळीला सामोरे जावे लागते त्यामुळे नागरिकांना त्रास होत असेल तर त्या उत्पन्नाचा फायदा काय. प्रशासनाने या गोष्टी गांभिर्याने घेतल्या पाहीजेे. माणसांपेक्षा शासन किंवा त्यानंा मिळणारा महसूल मोठा नाही, अशी प्रतिक्रीया ग्रामस्थांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*