खंडित वीजपुरवठ्याने कुकडी पट्ट्यातील शेतकरी त्रस्त

0

पाडळी रांजणगाव (वार्ताहर) – शेतीमालाचे घसरलेले दर, उन्हाचा चटका, दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असतानाच वीज महावितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे, तसेच सध्या सोडण्यात आलेल्या कुकडी आवर्तनाचे पाणी देखील शेतकर्‍यांना घेता येत नाही. त्यामुळे पाणी आहे तर वीज नाही, अशी शेतकर्‍यांची अवस्था झाली आहे.

 
भाजीपाला-फळभाज्या आणि विविध फळबागा सध्या पाणी देण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र, पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्याने शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विजेच्याविविध कारणांनी पिके संकटात आली आहेत.

 
तसेच होत असलेल्या भारनियमनामुळे अनेक गावात पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. नागरिक कमालीचे वैतागले असून या अतिरिक्त भारनियमाला आळा घालावा अशी मागणी होत आहे. व्यावसायिकांनाही दिवसभराच्या भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे त्याच बरोबर भारनियमनामुळे अनेक गावांतील पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाल्या आहेत.

 

आश्‍वासनाला बगल
शेतीसाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा करू अशी हमी शासनाने दिली होती. काही दिवसांतच या निर्णयाला वीज वितरण कंपनीने बगल दिली आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी हितासाठी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पाळून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.
– विक्रमसिंह कळमकर (उपसरपंच पाडळी, रांजणगाव)

 

मागणीत वाढल्याने भारनियमन
कोयना व कोराडी वीजसंचातील आणि महाराष्ट्रात विजेच्या मागणीत वाढ झाल्याने अतिरिक्त भारनियमन करावे लागत आहे. सध्या उदभवलेली परस्थिती पूर्वपदावर आल्यावर भारनियमन कमी व बंद करण्यात येईल तरी सर्वांनी संयम राखून कंपनीस सहकार्य करावे.
– मंगेश प्रजापती (उपअभियंता)

LEAVE A REPLY

*