क्रीडा मानसशास्त्रातील ‘भीष्माचार्य’ कालवश

भीष्मराज बाम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
नाशिक | दि. १२ प्रतिनिधी – क्रीडामानसोपचार तज्ञ, निवृत्त पोलीस महासंचालक व अविरत कर्मयोगी भीष्मराज पुरूषोत्तम बाम यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. महात्मानगर येथे आयोजित एका व्याख्यानात मार्गदर्शन करताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते कोसळले.
त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी सुधा, पुत्र नरेंद्र आणि अजित असा परिवार आहे. उद्या शनिवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता नाशिक अमरधाम येथे त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

भीष्मराज बाम हे नाशिकमधील महात्मानगर येथे वास्तव्यास होते. येथील महात्मा सभागृहात ते दर शुक्रवारी सायंकाळी व्याख्यान देत. आजही नेहमीप्रमाणे ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महात्मानगर येथील वाचनालयाच्या सभागृहात व्याख्यान देत असताना अचानक खाली कोसळले.

त्यांना तातडीने सिक्स सिग्मा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डॉ. कुणाल गुप्ते यांनी त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाहीे. क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून भीष्मराज बाम यांचे नाव क्रीडा क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जात होते. ऑलिम्पिकसह विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणार्‍या अनेक खेळाडूंना भीष्मराज बाम यांनी मार्गदर्शन केले.

विक्रमवीर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंसह ऑल्मिपिक विजेता अभिनव बिंद्रा, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, पी. गोपीचंद यांच्यासह अनेक खेळाडूंचा त्यामध्ये समावेश आहे. मानसिक तणाव व सांघिक व्यवस्थापन या विषयावर त्यांचे प्रभुत्व होते.

इंडीयन ऑलिम्पिक टीमचे ते मार्गदर्शक होते. त्र्यंबकेश्वरच्या योग विद्या गुरुकुल येथे येणार्‍या साधकांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवली होती. ऍप्लाइड मॅथेमॅटीक्स ऍन्ड स्टॅटीस्टीक हा त्यांचा विषय होता. त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्य शासनामार्फत २०११-१२ या वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

२०१४ साली राज्य शासनाने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले. विनिंग हॅबिट, टेक्निक्स फॉर एक्सलन्स इन स्पोर्ट्स, संधीचे सोने करणारी इच्छाशक्ती, विजयाचे मानस शास्र, मन सज्जना हे त्यांचे गाजलेले साहित्य होय.ङ्घमार्ग यशाचाफ, ङ्गसंधीचं सोनं करणारी इच्छाशक्तीफ, ङ्गविजयाचे मानसशास्त्रफ, ङ्गमना सज्जनाफ यांसारखी पुस्तकेही भीष्मराज बाम यांनी लिहिली. या पुस्तकांचा हिंदी, पंजाबी आणि तामिळ भाषेतही अनुवाद झाला.

याचबरोबर मराठीतील अनेक वृत्तपत्रांमध्ये बाम यांनी स्तंभलेखनही केले. १९६३ साली महाराष्ट्र पोलिस सेवेत पोलिस उपाअधिक्षक म्हणून ते रुजू झाले. १८ वर्षांच्या सेवेनंतर त्यांची गृहमंत्रालयात महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली. त्यानंतर पुढे ते पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त झाले. ङ्गदक्षताफ या पोलिस मासिकाचे ते दोन वर्षे मुख्य संपादकही होते. बाम यांनी राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या नेमबाजीसंघासह मुंबई रणजी संघाचे मानसोपचार सल्लागार म्हणून काम पाहिले होते.

योगशास्त्र अभ्यासक
भारतातील क्रीडापटूंना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे शिवधनुष्य बाम यांनी उचलले होते. बाम यांनी शासकीय खात्यातील सेवानिवृत्तीनंतर भारतीय योगशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यातून क्रीडामानसोपचार या विषयावर प्रभुत्व मिळविले. ङ्गतुमचा तुमच्यावर विश्वास हवा, स्वत:वर विश्वास असल्यास काहीही शक्य आहेफ, असे ते नेहमीच सांगत असत.
द्रविडला नवसंजीवनी
राहुल द्रविडचा समावेश आज यशस्वी खेळाडूंमध्ये होतो. पण हाच द्रविड १९९९ साली चाचपडत असताना त्याने भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर द्रविडने कधी मागे वळून बघितले नाही. फक्त क्रिकेटपटूच नव्हे नेमबाज अंजली भागवत, धावपटू कविता राऊत यांनाही भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला.

अल्पपरिचय
नाव: भीष्मराज पुरूषोत्तम बाम
जन्म : १ ऑक्टोबर १९३८
भुषविलेली पदे :
१९६३ साली पोलीस उपअधिकक्ष म्हणून रूजू.
राज्याचे पोलीस महासंचालक
पोलिस दलात १८ वर्ष सेवा.
इंडीयन ऑलिम्पिक टीमचे मार्गदर्शक
नॅशनल रायफल असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष
‘दक्षता’ या पोलिस मासिकाचे मुख्य संपादक
साहित्य संपदा
‘मार्ग यशाचा’, ‘संधीचं सोनं करणारी इच्छाशक्ती’, विनिंग हॉबिटस् (चार भाषांत)
‘विजयाचे मानसशास्त्र’, ‘मना सज्जना’
प्राप्त पुरस्कार
राष्ट्रपती पोलीस पदक
शिवछत्रपती पुरस्कार
राज्य शासनाचा क्रीडा जीवन गौरव पुरस्कार

LEAVE A REPLY

*