क्रिकेटच्या वादातून तरुणाला चाकूने भोसकले

0

जळगाव / क्रिकेट टुर्नामेंट फायनलच्या वादातुन मेहरुण पसिरातील तरुणाला चाकुने भोसकले.

पोटात चार वार झाल्याने तरुण गंभीर झाला. ही घटना सकाळी 11 वाजता घडली.

त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रुग्णालयासह तांबापुरामध्ये गर्दी निर्माण झाल्याने तणावाची परिस्थीती होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेहरुण परिसरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद वेल्फेअर एज्युकेशन यांच्यातर्फे टेनिस कासको बॉलवर टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते.

एज्युकेशनचे अध्यक्ष फिरोजखान नईम खान (वय 38 रा. रविकिराणाजवळ, दत्तनगर) यांच्यासह आयोजकांनी क्रिकेट टुर्नामेंट सुरु केली.

दि.8 ते दि.11 एप्रिल दरम्यान ही टुर्नामेंट झाली. या स्पर्धेत 32 टिम यांनी सहभाग घेतला.

प्रत्येकी 3 हजार रुपये फि एका संघाची होती. तर विजेत्या संघाला 51 हजार तर उपविजेत्या संघाला 31 हजाराचे बक्षिस जाहिर करण्यात आले होते.

दरम्यान फायनलमध्ये तांबापुरातील एक संघ आणि आयोजकांचा संघ यांच्यात मॅच होणार होती.

मॅच घेण्यास आयोजकांकडून टाळाटाळ होत असल्याने आयोजक व तांबापुरातील संघातील सदस्यांमध्ये अनेकवेळा वाद झालेत.

फिरोजवर चाकुने वार
जोशी वाडीमध्ये बांधकामाठिकाणी गवंडी काम करण्यासाठी जात असतांना सोबत असलेल्या मजुरांची महामार्गावरील रिलाईन्स पेट्रोल पंपाजवळी फिरोजखान नईम खान उभे होते.

याठिकाणी येवुन खलील अब्बास, पहेवान यांच्यासह दोघांनी फिरोजशी वाद घातला. या वादातुन खलील अब्बास याने चाकुने फिरोजवर चार वार केले.

यावेळी त्याच्याजवळ असलेली 31 हजाराची रोकड लांबवुन संशयित पसार झाल्याचे फिरोजने जिल्हा रुग्णालयात सांगितले.

 

LEAVE A REPLY

*