क्रांतीकारी संतश्री तरुणसागर महाराजांना अभिवादन

0
नंदुरबार । प्रखर विचारांचे धनी जैन मुनीश्री तरुण सागरजी महाराज यांच्या निधनाने नंदुरबार जैन समाज बांधव शोकमय झाले.नंदुरबार दिंगबर जैन समाजातर्फे संतश्री तरुण सागर महाराजांना विनयाजंली भावगितातुन अभिवादन करण्यात आले.

माणिक चौकाजवळील दिंगबर जैन मंदिराच्या प्रांगणात अभिवादन करण्यात आले. यावेळी नवकार गृपतर्फे भजन,भावगित सादर करण्यात आले.उपस्थित भाविकांनी तरुण सागर महाराजांच्या नंदुरबार भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी दिंगबर जैन समाज अध्यक्ष महेंद्र झांझरी,

महिला मंडळ अध्यक्षा अंजली अजमेरा,स्थानकवासी संघ अध्यक्ष प्रकाश कोचर,जैन जागृती प्लॅटीनमचे अध्यक्ष आकाश बेदमुथा,महक पहाडे,विजय अजमेरा,विरल कुवाडीया,स्वाती पाटोदी,विक्कि पाटोदी, शांतीपथचे ग्यानचंद पहाडे,तसेच पत्रकार रणजित राजपुत,महादु हिरणवाळे,यांनी तरुण सागरजी महाराजांना भावाजंली अर्पण केली.

सुत्रसंचालन सुरेश जैन यांनी केले.संयोजन चेतन जैन,पवन जैन व दिंगबर जैन युवकांनी केले.

LEAVE A REPLY

*