कौडगाव, बाबुर्डीतील मद्यपींचा मृत्यू विषारी दारूनेच

0

पोलिसांना वैद्यकीय अहवाल प्राप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील कौडगाव व बाबुर्डी घुमट मद्यपिंचा मृत्यू विषारी दारू पिल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी (दि.21) वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यात हा उलगडा झाला. मद्यपींच्या पोटात मिथेल अल्कहोल मिळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहाजी बापू चव्हाण (वय 27), प्रल्हाद सोपान तुपेरे (वय 60, रा. बाबुर्डी घुमट) व नरेंद्र दिवाकर चखाले (वय 35), बाळू नारायण मदगे (वय 45, रा. कौडगाव) अशी मयतांची नावे आहेत.
नगर तालुक्यातील कौडगाव व बाबुर्डी घुमट येथे मयत झालेल्या चौघांनी तीन महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या काळात मद्य घेतले होते. अचानक त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील दोघ मयत झाल्यानंतर अन्य दोघांना पुण्याला हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ते मयत झाले. हा प्रकार का व कसा घडला याबाबत सर्व अनभिज्ञ होते. मात्र त्या पाठोपाठ तालुक्यातील पांगरमल येथे 20 पेक्षा जास्त मद्यपींना विषबाधा झाली होती. हे मद्य कोठून आले याचा तपास करीत असताना बनावाट दारुचा कारखाना जिल्हा रुग्णालयातील कॉन्टीनमध्ये असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
याप्रकरणी पोलिसांनी जीतू गंभीर, मोहन दुग्गल, सोनू दुग्गल, जाकीर शेख, नन्या सोमाणी, अमीत मोतियानी, दादा वाणी, जोशी, याकुब शेख नवनाथ घाडगे, भाग्यश्री मोकाटे, भीमराज आव्हाड, जयश्री मोकाटे यांच्यासह 16 जणांना अटक केली आहे. मयत झालेल्या नऊजणांच्या पोटात मिथेल अल्कहोल असल्याचे वैद्यकीय अहवालात आले होते.
या दरम्यान, नगर तालुक्यातील दरेवाडी येथे देखील दोघांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी सोनु दुग्गल, मोहन दुग्गल यांच्यासह तिघांना अटक केले आहे. या आरोपींनी मयतांना बनावट दारु तयार करून पाजल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याच आरोपींनी कौडगाव व बाबुर्डी बेंद येथील चौघांना बनावट मद्य वितरीत केल्याचा संशय पोलिसांनी घेतला आहे. सध्या अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण परदेशी करीत आहेत.

पांगरमलच्याच आरोपींवर बालंट !पांगरमलच्याच आरोपींवर बालंट !  जीतू गंभीर, मोहन दुग्गल, सोनु दुग्गल, जाकीर शेख, नन्न्या सोमाणी, अमीत मोतीयानी, याकुब शेख ही सर्व पांगरमल घटनेतील आरोपी आहेत. त्यांना कौडगाव व बाबुर्डी घुमट येथील घटनेत आरोपी करण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांना माहिती विचारली असता त्यांनी या आरोपींबाबत दुजोरा दिला.

LEAVE A REPLY

*