कौटूंबिक कलह : भादली येथील विवाहितेची आत्महत्त्या

0

जळगाव | प्रतिनिधी :  तालुक्यातील भादली येथील विवाहितेन साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकिस आला. याप्रकरणी तालुका पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील भादली खुर्द येथे सतीष कोळी-बाविस्कर हे पत्नी कविता(वय २६), मुलगा गौरव (वय ७), मुलगी कल्याणी (वय ३)  यांच्या सोबत राहतात. सतीष कोळी हे तहसिलदार अमोल निकम यांच्या निवासस्थानी शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

सतीश हे सकाळी तहसिलदार निकम यांच्या निवासस्थानी ड्युटीवर गेले. तर दोघं मुलं शाळेत गेली. यावेळी घरी कोणी नसल्याचे पाहुन कविता बाविस्कर हिने साडीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सतिष कोळी यांच्या घरासमोरच त्यांची आई अनुसयाबाई व चुलत जेठ अनिल कोळी राहतात. अनुसयाबाई यांना उशिर झाला तरी मुलगा सतीश याचे घर उघडे दिसत नसल्याने त्या सतीशच्या घरी आल्या.

सुन कविता हिला बाहेर आवाज दिल्यावरही त्यांना घरातुन कविताने प्रतिसाद दिला नाही. त्यामूळे अनुसयाबाईंनी खिडकीतून घरात डोकाविले. यावेळी कविता हिने गळफास घेतलेला त्यांना दिसला. त्यांना आरोडाओरड केल्याने चुलत जेठ अनिल कोळी यांच्यासह शेजारच्यांनी दरवाजा तोडून कविताला खाली उतरविले.

जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणत असतांनाच रस्त्यांमध्येच त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*