LOADING

Type to search

कोहली भारताचा श्रीमंत खेळाडू!

क्रीडा

कोहली भारताचा श्रीमंत खेळाडू!

Share
नवी दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या आपल्या आजी-माजी सहकार्‍यांना मागे टाकत, 2018 सालातील सर्वात श्रीमंत खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे.

किंबहुना 2017 सालातील आपल्या वार्षिक उत्पनापेक्षा यंदाच्या उत्पन्नात विराटने दुपटीने वाढ केली आहे. फोर्ब्स इंडिया मासिकाने यासंदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे. विराटने 2018 सालात 228.09 कोटी इतकी कमाई केली आहे.

जाहीर झालेल्या यादीत विराटने दुसरे स्थान पटकावले असून खेळाडूंच्या गटात तो पहिला आहे. 2017 साली विराटने 100.72 कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने यंदाच्या वर्षातही या यादीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. 2018 सालातले सलमानचे उत्पन्न हे 235.25 कोटी इतके आहे.

फोर्ब्जने जाहीर केलेल्या यादीत महेंद्रसिंह धोनी 101.77 कोटींच्या मिळकतीसह पाचव्या स्थानावर आहे. तर सचिन तेंडुलकरने 80 कोटींच्या उत्पन्नासह नववे स्थान मिळवले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खेळाडूंच्या गटामध्ये पहिल्या सात जणांमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनेही आपले स्थान पक्के केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!