कोहलीची ‘विराट’ कामगिरी

0
साऊथहॅम्पटन । भारताचा कर्णधार विराट हा सध्या आपल्या नावाप्रमाणे क्रिकेटमध्ये मविराटफ कामगिरी करत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा 1 विक्रम आपल्या नावे केला आहे. फलंदाजीस आलेल्या विराटने 6 धावा करताच, कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

सचिन तेंडुलकरला कसोटीमध्ये 6 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 120 डाव खेळावे लागले होते. मात्र, विराट कोहलीने 119 डावांमध्ये 6 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. सध्या भारताची पहिल्या डावातील आतापर्यंतची धावसंख्या 100-2 असून विराट कोहली (25) तर, चेतेश्वर पुजारा (28) धावांवर नाबाद खेळत आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहलीने सातत्याने चांगला खेळ केला आहे. आतापर्यंत कोहलीने या मालिकेत 6 डावांमध्ये 440 धावा केल्या आहेत. तसेच या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा या विराटच्याच नावावर आहेत.विराट कोहलीला कसोटीमध्ये सहा हजार धावा करण्यासाठी फक्त सहा धावांची होती. कोहलीने आतापर्यंत 119 डावांत 6000 धावांचा टप्पा पूर्ण केला. सचिनने 120 डावांत सहा हजार धावा केल्या होत्या. त्यामुळे धावा काढण्याच्या बाबतीत विराट सचिनच्या एक पाऊल पुढे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.आज विराट कोहलीने चौथ्या कसोटीत सहा धावा काढत सचिनचा विक्रम मोडला. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट सचिनचा हा विक्रम मोडेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना होताच.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने सहा डावांत 440 धावांचा डोंगर उभा केला आहे. या मालिकेत विराट विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. आतापर्यंत विराट कोहलीने 69 कसोटी सामन्यातील 118 डावांत फलंदाजी करताना 23 शतकांसह 5994 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीची सरासरी 55 आहे. कसोटीमध्ये विराट कोहलीची 248 धावांची सर्वोत्तम खेळी आहे.

LEAVE A REPLY

*