Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

कोरोनाचा कहर : जगात साडेचार लाखावर पॉझिटिव्ह, २० हजार मृत्यू

Share

नवी दिल्ली – कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या ६८७ झाली आहे. यातील ६४२ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण कोरोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारांहून अधिक असून मृतांची संख्या २० हजारहून अधिक झाली आहे. जगात इटलीला सर्वाधिक फटका बसला असून साडेसात हजार लोकांना कोरोनाने मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात ६८३ लोकांचा इटलीत मृत्यू झाला. स्पेनमध्येही काल ६५६ लोकांचा बळी गेला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!