कोपर्ली येथे मुसळधार पाऊस ; वीज पडून माजी ग्रा.पं.सदस्याचा मृत्यू

0
नंदुरबार / तालुक्यातील कोपर्ली येथे आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून माजी ग्रा.पं. सदस्याचा जागीच मृत्यू झाला तर दोन गायीही ठार झाल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे आज दुपारी वादळी वारा व वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
पाऊस सुरू असतांना गायींना गोठयात बांधण्यासाठी कोपर्ली येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुपडू भुर्‍या भिल हे गेले असता, दोन गायींना गोठयात बांधत असतांना गोठयावरच अचानक वीज कोसळली.
यात श्री.भिल हे जागीच ठार झाले तर दोन गायीही जागीच मृत्यूमुखी पडल्या. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात जोरदार पावसाला प्रारंभ झाला आहे. काल रात्रीदेखील परिसरात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नंदुरबार तालुक्यात मान्सुनपूर्व पाऊस सुरू असून ठिकठिकाणी वीज पडून मृत्यू होण्याच्या दुर्घटना वाढल्या आहेत.

याबद्दल तहसिल कार्यालयामार्फत त्वरीत पंचनामे त्वरीत होणे अपेक्षित आहे. आज तळोद्यात देखील मुसळधार पाऊस झाला.

LEAVE A REPLY

*