कोपर्डी प्रकरण : आरोपीचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तपासण्याची मागणी

0
अर्जांवर ७ जुलैला सुनावणी
तीसर्‍या आरोपीचा जबाब पुर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपर्डी खटल्यात आरोपी नितीन भैलुमे याचे वकील ऍड. प्रकाश आहेर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांना आरोपीच्या वतीने साक्षीदार म्हणुन तपासायचे आहे. असा अर्ज न्यायालयात सादर केला आहे.
गुन्हा घडल्यानंतर फडणवीस यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते की; आरोपींना एका महिन्यात शिक्षा लागण्यासाठी ऍड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या खटल्यात बर्‍याच काही घटना रचण्यात आल्या आहेत. म्हणुन आम्हाला हे दोन साक्षीदार तपासायचे आहेत. या अर्जावर सरकार पक्षाचे म्हणणे मागितले असून ऍड. खोपडे व आहेर यांच्या अर्जावर ७ जुलै रोजी ऍड. निकम म्हणणे मांडणार आहेत.
कोपर्डी अत्याचार प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात तीन आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे व दुसरा सहआरोपी संतोेष भवाळ यांच्यानंतर शुक्रवारी या गुन्ह्यातील तीसरा आरोपी संतोष भवाळ याचे जबाब नोंविण्यात आले. संतोष भवाळ याच्यावर कट रचल्याचा आरोप आहे. त्याने सांगितले की; मी या घटनेच्या वेळी आरोपींसोबत नव्हतो. मोेर्चे आंदोलने झाल्यानंतर मला टारगेट करण्यात आले.
पोलिसांनी माझी नार्को टेस्ट केली. त्याचा अहवाल दोषारोपपत्रात लावण्यात आलेला नाही. मुंबई येथे दातांचे नमुने घेण्यात आले असे पोलिसांनी सांगितले. मात्र माझ्या दातांचे कोणतेही नमुने घेतले नाही. फक्त दुरून एक माझा फोटो काढला होता. या गुन्ह्यात बरेच साक्षीदार असे आहेत की जे पिडीत मुलीचे भाऊ, बहिन, काका, अजोबा असे नातेवाईक आहेत. तसेच एकाही साक्षीदाराने माझी सत्य ओळख सांगितली नाही. माझे नाव देखील चूकीचे सांगण्यात आले आहे. खरे तर मी पुण्यात शिक्षण घेत आहे. त्यामुळे माझा कोपर्डीशी काही संबंध नाही. मात्र तपासी अधिकार्‍यांनी मला काही गोष्टी खोट्या सांगून माझी दिशाभुल केली. त्यामुळे या घटनेत मला गोवण्यात आल्याचे भैलुमे म्हणाला.
घटनेतील काही गोष्ठी खोट्या असल्याचे सांगताना भैलुमेला भावना अनावर झाल्या होत्या. त्यामुळे काही काळ वातावरण भावनिक झाले होते.
दरम्यान आरोपी संतोष भवाळचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी साक्षीदार म्हणुन विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम व जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्यासह सहा साक्षीदारांना तपासावे अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. यावर ऍड. निकम यांचे म्हणणे मागविले आहे.
ऍड. आहेर यांनी मुख्यमंत्री व जेष्ठ पत्रकार यांना तपासण्यासाठी अर्ज दाखल केल्यामुळे निकम यांनी दोन्ही अर्जावर ७ जुलै रोजी म्हणणे सादर करणार असल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरुन पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपीच्या सुटकेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, ऍड. निकम, जिल्हाधिकारी हे साक्षीदार म्हणून उभे राहतील का? याकडे सर्वांचे लाक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*